शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कायदेशीर अभ्यासानंतर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासंदर्भात निर्णय: गिरीश महाजन

By संकेत शुक्ला | Updated: February 22, 2025 20:50 IST

पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटेल असाही व्यक्त केला विश्वास

संकेत शुक्ल, नाशिक: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासंदर्भात वरिष्ठ नेते कायदेशीर अभ्यास करून निर्णय घेतील. मुख्यमंत्री स्वत: कायदेतज्ज्ञ आहेत. हा प्रश्न तांत्रिक बाबीत अडकला असून, याबाबत ते योग्य तो निर्णय घेतील असे स्पष्टिकरण देतानाच देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांची भेट झाली असून येत्या दोन दिवसांत पालकमंत्री पदाचा तिढाही सुटेल, असा विश्वास जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला हप्ता लाभार्थ्यांना देण्यासाठी शनिवारी (दि. २२) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात आयोजित कार्यक्रमानंतर माध्यमांची संवाद साधताना ते बोलत होते. प्रारंभी जुन्या नाशकातील अतिक्रमणीत बांधकाम काढण्यात आले असून, स्थानिक लोकांच्या मागणीनुसार ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. माणिकराव कोकाटे यांच्याबाबत सुरू असलेले प्रकरण कायदेशीर बाब आहे. कोणी मागीतला म्हरून राजीनामा घेता येत नाही. नियमाला अधीन राहून वरिष्ठ नेते त्याबाबत निर्णय घेतील, असेही महाजन म्हणाले.

सिंहस्थासाठी कमी कालावधी राहिला आहे. पालकमंत्री नियुक्त करण्यासही उशीर झाला आहे. गृहमंत्री अमित शाह पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. सकाळीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी त्यांची भेट घेतल्याचे समजते. या भेटीत पालकमंत्रिपदाबाबत चर्चा झालीच असेल. येत्या दोन दिवसांतच हा तिढादेखील सुटेल, असा आशावाद व्यक्त करताना त्यांनी पालकमंत्रिपदाबाबत पुन्हा एकदा देवाच्या मनात असेल तसे होईल, असे सांगितले.

भुजबळ मोठे नेते...

अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ राष्ट्रवादी पक्षाच्या बैठकांना उपस्थित राहत नाहीत. भाजपच्या नेत्यांची मात्र ते भेट घेतात, असे विचारले असता भुजबळ मोठे नेते अहेत. त्यामुळे ते कोणाच्या भेटीला कधीही जाऊ शकतात, असेही महाजन म्हणाले.

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनManikrao Kokateमाणिकराव कोकाटेguardian ministerपालक मंत्री