शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
6
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
7
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
8
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
9
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
10
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
11
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
12
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
13
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
14
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
15
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
16
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
17
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
18
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
19
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
20
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट

ठेवीदार संघर्ष समितीचा संसदेच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा निर्धार,हुतात्मा स्मारकातील बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 18:48 IST

राज्यभरातील डबघाईला आलेल्या व अवसायनात निघालेल्या विविध सहकारी बँका व पतसंस्थांच्या ठेविदारांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे.

ठळक मुद्देसंसदेच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा निर्धारअवसायनात निघालेल्या संस्थांच्या ठेवीदारांची बैठक ठेवी परत मिळविण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन

नाशिक : जिल्ह्यासह राज्यभरातील डबघाईला आलेल्या व अवसायनात निघालेल्या विविध सहकारी बँका व पतसंस्थांच्या ठेविदारांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे.हुतात्मा स्मारक येथे शुक्रवारी (दि.1) श्रीकृष्ण शिरोडे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी बीएचआर , तापी , कपालेश्वर आदिंसह राज्यभरातील विविध पतसंस्थांमध्ये व वेगवेगळ्या पोन्झी स्कीमद्वारे फसवले गेलेल्या गुतवणूकदाकरांना मार्गदर्शन करताना श्रीकृष्ण शिरोडे यांनी एकत्रित येण्याचे आवाहन केले. अधिक दराने मिळणाऱ्या व्याजाच्या लालसेपोटी तसेच दाम दुप्पट मोबदला मिळण्याच्या आशेने नाशिक शहरासह संपूर्ण राज्यभरातील विविध भागातील नागरिकांनी सहकारी पतसंस्था आणि वेगवेळ पोन्झी स्कीममध्ये पैसे अडकवले आहेत. या गुंतवणूकदारांमध्ये राष्ट्रीयकृत बँकांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह वेगवेगळ्य़ा शासकीय विभागांमध्ये काम करणा:या उच्च पदस्थ अधिका:यांचाही समावेश आहे. मात्र बहूतांश गुंतवणूकदार हे निवृत्त कर्मचारी तथा ज्येष्ठ नागरिक असून या सर्वानी आपल्या ठेवी परत मिळविण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन शिरोडे यांनी केले आहे. ते म्हणाले,फसवल्या गेलेल्या ठेवीदारांनी आपल्या ठेवी परत मिळविण्यासाठी एकजुटीची वज्रमुठ आवळण्याची गरज असून एकत्रित प्रयत्न केले तरच गुंतवणुकदारांना आपल्या ठेवी परत मिळू शकतात. त्यासाठी सर्वानी एकत्र येत संसदेच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला. या बैठकीत नशिक शहरासह जिल्ह्यातील येवला, सिन्नर, दिंडोरी, इगतपुरी, पुणे, अहमदनगर आदि भागातील ठेवीदारही सहभागी झाले होते.न्यायमंचच्या निकालानंतरही नाही मिळाल्या ठेवी

दिंडोरीचे मधुकर भालेराव यांनी बीएचआरमध्ये सुमारे 5 लाखांच्या ठेवी ठेवलेल्या आहे.या ठेवींची रक्कम त्यांना परत करण्याचे आदेश न्यायमंचने जानेवरी महिन्यातच दिले होते. परंतु सस्थेच्या शाखेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती भालेराव यांनी दिली. त्यांनी 13 टक्के व्याजदराने दोन व पाच लाख रुपयांच्या दोन ठेली ठेवलेल्या असून न्यायमंचच्या निकालानंतरही पैसे मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :bankबँकagitationआंदोलन