शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
4
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
5
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
6
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
7
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
8
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
9
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
10
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
11
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
12
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
13
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
14
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
15
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
16
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
18
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
19
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा

निर्णय : बाहेरच्या व्यापाऱ्यांसदर्भात संचालक मंडळाची बैठक

By admin | Updated: November 23, 2014 22:32 IST

लासलगावी आजपासूून शेतमालाचे लिलाव पूर्ववत

लासलगाव : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतीमालाचे लिलाव प्रचलित पद्धतीनुसार उद्या सोमवारी पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतल्याची माहिती लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नानासाहेब पाटील व सचिव बी. वाय. होळकर यांनी दिली. स्थानिक व्यापारी संघटनेचे सभासद नसल्याने लिलावात बोली लावण्याच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या प्रश्नामुळे लासलगाव कृषी उत्पन्न समितीत रविवारी सकाळी बाजार समितीचे सभापती नानासाहेब पाटील यांच्या अध्यक्षततेखाली संचालक मंडळाची सभा संपन्न झाली. या बैठकीला उपसभापती इंदूबाई तासकर, संचालक राजाराम दरेकर, बबनराव सानप, शिवाजीराव ढेपले, भास्करराव पानगव्हाणे, शिवाजीराव तासकर, तानाजी पूरकर, नंदकुमार डागा, जयदत होळकर, बाळासाहेब क्षीरसागर, सचिन बह्मेचा, पंढरीनाथ थोरे, राजेंद्र डोखळे, दिलीप गायकवाड, छाया इकडे, प्रमोद शिंदे सुरेखा नागरे व सचिव बी. वाय. होळकर, वैभव तासकर, भास्कर इकडे आदी उपस्थित होते.बैठकीत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने परवाना दिलेल्या अनुज्ञप्तीधारक खरेदीदार व्यापाऱ्यास केवळ स्थानिक मर्चंटस असोसिएशनचे सभासद नाही म्हणून लिलावात सहभाग घेता येत नाही. याबाबत वेगळे काही करता येईल का याविषयी अधिक चर्चा करण्यात आली , व पूर्ववत पध्दतीने लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. (वार्ताहर)