शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

१८ मार्चनंतर होणार निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 01:09 IST

महापालिकेच्या स्थायी समितीच्या एका जागेसंदर्भात विभागीय आयुक्तांनी शिवसेना, भाजपा आणि महापालिकेचे म्हणणे ऐकून घेतले आहे. तथापि, विभागीय आयुक्तांनी याबाबत निर्णय द्यावा, असे उच्च न्यायलयाचे कोणतेही आदेश प्राप्त नसल्याने त्यांची साक्षांकित प्रत आयुक्तांनी सादर करण्यास सांगितले आहे. त्यानंतर ते सोमवार, दि. १८ मार्च रोजी भूमिका स्पष्ट करणार आहेत.

ठळक मुद्देस्थायी समिती वाद : सेना-भाजपाच्या गटनेत्यांनी मांडली बाजू

नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीच्या एका जागेसंदर्भात विभागीय आयुक्तांनी शिवसेना, भाजपा आणि महापालिकेचे म्हणणे ऐकून घेतले आहे. तथापि, विभागीय आयुक्तांनी याबाबत निर्णय द्यावा, असे उच्च न्यायलयाचे कोणतेही आदेश प्राप्त नसल्याने त्यांची साक्षांकित प्रत आयुक्तांनी सादर करण्यास सांगितले आहे. त्यानंतर ते सोमवार, दि. १८ मार्च रोजी भूमिका स्पष्ट करणार आहेत.महापालिकेत भाजपाचे ६६ नगरसेवक होते. त्यापैकी सुदाम नागरे यांचे निधन झाल्याने भाजपाचे पक्षीय तौलनिक संख्याबळ कमी झाले आहे. त्यामुळे स्थायी समितीत भाजपाचे नऊ ऐवजी आठच सदस्य राहू शकतात आणि त्या तुलनेत शिवसेनेचे अपूर्णांकातील संख्याबळ अधिक असल्याने शिवसेनेचा एक जास्त सदस्य स्थायी समितीत सामाविष्ट होऊ शकतो, असे शिवसेनेचे म्हणणे होते. यासंदर्भात शिवसेनेने गेल्या महिन्यात उच्च न्यायालयात दाद मागितली होती. पक्षीय गटांची नोंदणी विभागीय आयुक्तांकडे केली जात असल्याने उच्च न्यायालयाने विभागीय आयुक्तांकडे यासंदर्भात अहवाल मागितला होता. त्या अनुषंघाने विभागीय आयुक्तांनी शिवसेना गटनेता विलास शिंदे, भाजपा गटनेता संभाजी मोरुस्कर तसेच महापौर रंजना भानसी, आयुक्त राधाकृष्ण गमे आणि नगरसचिव गोरखनाथ आव्हाळे यांना पाचारण केले होते. त्यावर सुनावणी घेतानाचा सोमवारी (दि. ११) उच्च न्यायलयाने विभागीय आयुक्त निर्णय घेतील असे निकालात नमूद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तथापि, विभागीय आयुक्तांकडे यासंदर्भातील निकालाची प्रत नसल्याने निकालाची सर्टिफाइड कॉपी सादर करण्यास आयुक्तराजाराम माने यांनी बजावले असून, ती प्राप्त झाल्यानंतर १८ मार्चपर्यंत ते भूमिका स्पष्ट करणार आहेत.दरम्यान, महापालिकेच्या वतीने अ‍ॅड. व्ही. व्ही. पारख यांनी बाजू मांडली, तर शिवसेनेच्या वतीने अ‍ॅड. अनंतराव जगताप यांनी बाजू मांडली. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणी केली जाते. त्यानंतर पक्षीय तौलनिक बळ ठरते आणि त्यानुसार स्थायी समिती किंवा अन्य समित्यांवर नियुक्त केले जातात. त्यामुळे नंतर पक्षीय तौलनिक संख्याबळाचे महत्त्व गौण ठरते असे पारख यांनी सांगतानाच पक्षीय तौलनिक बळ ठरविण्याचे सर्वाधिकार महापालिकेचे असतात. वसंत गिते तसेच अ‍ॅड जे. टी. शिंदे यांच्यासंदर्भातील महापालिकेच्या काही जुन्या घटनांचे दाखलेही यावेळी त्यांनी दिले. विलास शिंदे यांच्या वकिलांनी पक्षीय तौलनिक बळानुसार समिती सदस्य नियुक्त केले जातात व यासंदर्भातील अधिकार विभागीय आयुक्तांनाच असल्याचे सांगितले. विभागीय आयुक्तांनी दोन्ही गटांचे म्हणणे ऐकले असून, आता ते काय निकाल देतात याकडे लक्ष लागून आहे.प्रतीक्षा निकालानंतरच संभ्रम होणार दूरउच्च न्यायालयाने विभागीय आयुक्तांना अहवाल सादर करण्यास सांगितले होते व त्या आधारे दि.११ मार्च रोजी सुनावणी ठेवली होती, मात्र विभागीय आयुक्तांचा अहवाल प्राप्त होण्याच्या आतच न्यायालयाने उच्च न्यायालयाने आदेश दिल्याने काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. आता उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत हाती पडल्यानंतरच हा संभ्रम दूर होणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcommissionerआयुक्त