शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

वाहनतळ दंडामध्ये बदल करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 00:10 IST

कॅन्टोन्मेंट बोर्डाने शहरातील वाहतुकीच्या समस्या सोडविण्यासाठी वाहनतळ शुल्क आकारणीच्या घेतलेल्या निर्णयाचा जनतेकडून विरोध होत होता. सदर विरोध लक्षात घेऊन व्यापारी व नागरिकांच्या सोयीसाठी वाहनतळ शुल्क व दंडामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

देवळाली कॅम्प : कॅन्टोन्मेंट बोर्डाने शहरातील वाहतुकीच्या समस्या सोडविण्यासाठी वाहनतळ शुल्क आकारणीच्या घेतलेल्या निर्णयाचा जनतेकडून विरोध होत होता. सदर विरोध लक्षात घेऊन व्यापारी व नागरिकांच्या सोयीसाठी वाहनतळ शुल्क व दंडामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.कॅन्टोन्मेंट बोर्डाची सभा ब्रिगेडीयर पी. रमेश यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्रारंभी दिवंगतांना श्रद्धांजली वाहून नवनिर्वाचित सदस्य कमांडंट कर्नल बिस्त यांचा शपथविधी झाला. पार्किंगवरून गेल्या काही महिन्यांपासून नागरिक व प्रशासनात धुसफूस सुरू होती. या पार्श्वभूमीवर नगरसेवकांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने उपाध्यक्ष कटारिया, नगरसेवक ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेत ही योजना रद्द करण्याची मागणी केली. मात्र शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी ही योजना असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट झाल्यानंतर त्यात बदल करावा, अशी मागणी सर्व नगरसेवकांनी उचलून धरल्याने प्रशासनाला नमते घ्यावे लागले. नवे धोरण दि. १ आॅक्टोबरपासून राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.याशिवाय कॅन्टोन्मेंट जनरल रु ग्णालयात भगूर-देवळालीसह २८ खेड्यांतील नागरिक उपचारासाठी येत असून, येथील सुविधा चांगल्या असल्याने गेल्या काही वर्षांपासून रु ग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे दंतरोग व स्त्रीरोग तज्ज्ञ दररोज उपलब्ध करणेबाबत निर्णय झाला. आमदार योगेश घोलप यांच्या निधीतून ४५ लाखांची कामे मंजूर करण्यात आली. कर भरणेसाठी डेबिट व क्रेडिट कार्डची सोय, ९२ गाळ्यांचे व्यापारी संकुल बीओटी तत्त्वावर देणे, पूर्वीच्या जकात नाक्याचे शेड व जागा भाडेतत्त्वावर देणे, विद्यार्थ्यांना गणवेश, व्यापारी लायसनचे नूतनीकरण करणेबाबत निर्णय घेण्यात आला. बोर्ड अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी व नगरसेवकांचे शिष्टमंडळ जुने बस स्टॅण्ड, सिंधी पंचायत हॉल, गुरूनानी प्लाझाची मागील बाजू, जुना कोंडवाडा यांची पाहणी करून तिथे पार्किंग सुविधा देणेबाबत विचार करणार आहेत. यावेळी नगरसेवक बाबुराव मोजाड, दिनकर आढाव, प्रभावती धिवरे, आशा गोडसे, मीना करंजकर, कावेरी कासार, कर्नल अतुल बिस्त, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार आदी उपस्थित होते.दुचाकीला शुल्क नाहीपार्किंगसाठी दुचाकीला कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग राहणार आहे. चारचाकीसाठी दंडात्मक रक्कम पाचशेवरून तीनशे करण्यात आली. चारचाकीसाठी हौसनरोडवर नो पार्किंग कायम असून मुख्य रस्त्यावर मुल्ला कॉम्प्लेक्स ते गुलशन टॉवर, राम भरोसे कॉम्प्लेक्स ते सेलो फोटो स्टुडिओ, महाराष्ट्र बँक ते लेव्हिट मार्केटमागे हा भाग मोफत पार्किंग म्हणून घोषित करण्यात आला.

टॅग्स :NashikनाशिकParkingपार्किंग