शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धेची फसवणूक; दीड लाखांचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 01:27 IST

अज्ञात इसमाने खिशातून पाचशे रुपयांची नोट काढून ही साईबाबांची विभूती आहे. तुम्ही तुमचे दागिने काढून या नोटेत गुंडाळून ठेवा, असे सांगून ७६ वर्षीय वृद्धेची फसवणूक करून सोन्याची चेन व सोन्याची माळ असा एकूण एक लाख ४५ हजारांचा ऐवज चोरून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ओझर पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली आहे.

ओझर टाउनशिप : अज्ञात इसमाने खिशातून पाचशे रुपयांची नोट काढून ही साईबाबांची विभूती आहे. तुम्ही तुमचे दागिने काढून या नोटेत गुंडाळून ठेवा, असे सांगून ७६ वर्षीय वृद्धेची फसवणूक करून सोन्याची चेन व सोन्याची माळ असा एकूण एक लाख ४५ हजारांचा ऐवज चोरून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ओझर पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली आहे.शुक्र वारी (दि. २०) सांयकाळी ५ वाजेच्या सुमारास कमल मधुकर खरोटे (७६, रा. पगार गल्ली, शिवाजीरोड, ओझर) या सुमनबाई पल्हाळ यांचे घरासमोर गप्पा मारत असताना ३५ ते ४० वयोगटातील एक अज्ञात इसम त्यांच्याजवळ आला. त्याने, साईबाबांचे मंदिर बांधत आहोत. त्यासाठी तुम्ही दान करा, तुम्हाला वरकरणी होईल असे सांगून त्याच्या खिशातून पाचशे रुपयांची नोट काढली. ही साईबाबांची विभूती आहे. तुम्ही तुमचे दागिने या नोटेत गुंडाळून ठेवा असे सांगितले. कमल खरोटे यांनी गळ्यातील सोन्याची चेन व सोन्याच्या मण्यांची माळ काढून नोटेत गुंडाळून त्या इसमाकडे दिली. त्याने ते एका प्लॅस्टिक पिशवीत ठेवून पिशवी खरोटे यांच्यासमोर ठेवली व लगेचच तो मोटारसायकलवर बसून पळून गेला. खरोटेंनी पिशवी बघितली असता त्याने ठेवलेल्या पिशवीत दागिने नव्हते. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी ओझर पोलिसांत धाव घेतली. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहेत.महिलेच्या गळ्यातील पोत लंपासमालेगाव : तालुक्यातील वडेल शिवारातील टिपे रोड येथे राहणाऱ्या महिलेकडे पिण्यासाठी पाणी मागण्याचा बहाणा करून अज्ञात भामट्याने महिलेच्या गळ्यातील १७ हजार ५०० रुपये किमतीची सोन्याची पोत हिसकावून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी मधुकर सीताराम शेलार यांनी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अंगात लाल रंगाचा शर्ट, सावळा रंग, उंची साडेपाच फूट अशा वर्णनाच्या भामट्याने शेलार यांच्या आईच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून नेली. पुढील तपास उपनिरीक्षक पाटील हे करीत आहे.मालेगाव येथे फळविक्रेत्याकडून ग्राहकास मारहाणमालेगाव : दुसरी प्लॅस्टिक पिशवी मागितल्याचा राग येऊन फळविक्रेत्याने ग्राहकास मारहाण केल्याप्रकरणी आयेशानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आत्माराम भगवान भालेराव यांनी फिर्याद दिली. त्यांचा भाऊ देवीदास भालेराव याने फळविक्रेता एकबाल (पूर्ण नाव माहीत नाही) याच्याकडून फळे घेऊन प्लॅस्टिकच्या पिवशीत ठेवले. पिशवी फाटल्याने त्याने एकबालकडे दुसरी पिशवी मागितली. याचा राग येऊन संशयित एकबालने देवीदासला मारहाण केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गिरी हे करीत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी