शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांना वीज बिलासाठी डिसेंबरअखेरची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 01:12 IST

शेतकºयांच्या थकीत वीज बिलासाठी महावितरणने कृषी संजीवनी योजना जाहीर करूनही अपेक्षित कृषी वीज बिल भरणा होऊ शकला नसल्याने शेतकºयांनी योजनेला फारसा  प्रतिसाद दिला नसल्याचे दिसून येते. योजना लागू करूनही शेतकºयांचे बिलासंदर्भातील प्रश्न कायम असल्याने राज्यातील ग्राहक संघटनांनी ऊर्जामंत्री बावनकुळे यांची भेट घेऊन शेतकºयांना वीज बिलातच दुरुस्ती आणि सवलत देण्याची मागणी केली होती. त्यानुसार शेतकºयांची वीज बिले दुरुस्त करण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत देण्यात आली आहे.

नाशिक : शेतकºयांच्या थकीत वीज बिलासाठी महावितरणने कृषी संजीवनी योजना जाहीर करूनही अपेक्षित कृषी वीज बिल भरणा होऊ शकला नसल्याने शेतकºयांनी योजनेला फारसा  प्रतिसाद दिला नसल्याचे दिसून येते. योजना लागू करूनही शेतकºयांचे बिलासंदर्भातील प्रश्न कायम असल्याने राज्यातील ग्राहक संघटनांनी ऊर्जामंत्री बावनकुळे यांची भेट घेऊन शेतकºयांना वीज बिलातच दुरुस्ती आणि सवलत देण्याची मागणी केली होती. त्यानुसार शेतकºयांची वीज बिले दुरुस्त करण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत देण्यात आली आहे.  राज्य शासनाने महावितरणमार्फत शेतकरी वीज ग्राहकांसाठी कृषी संजीवनी योजना जाहीर केली होती. मात्र मुदतवाढ देऊनही योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही. शेतकºयांना आलेली अवास्तव वीज बिले तसेच अंदाजित बिलांमुळे शेतकºयांवर मोठा आर्थिक बोजा आला होता. अनेक शेतकºयांना तर पुरवठा नसतानाही त्यांना देयके देण्यात आली होती. हा मूळ प्रश्न कायम असताना केवळ बिल भरण्यावर सवलत देण्यासाठी कृषी संजीवनी योजना जाहीर करण्यात आली होती. याबाबतच्या तक्रारी ग्राहक संघटनांकडे आल्यानंतर राज्यातील प्रमुख ग्राहक प्रतिनिधींनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर वावनकुळे यांची भेट घेत चर्चा केली होती. यावेळी ऊर्जा सचिव, महातिरणचे व्यवस्थापकीय संचालक हेही उपस्थित होते. यावेळी बावनकुळे यांनी मूळ बिलातील दोष दूर करण्यात येईल, असे जाहीर करून सवलतही जाहीर केली.  यासंदर्भात नाशिक वीज ग्राहक समितीचे सचिव सिद्धार्थ सोनी यांनी सांगितले की, ज्या शेतकरी ग्राहकांचे कृषी बिल ३० हजारापेक्षा कमी असेल त्यांना ३ हजार रुपये तर ज्यांची थकबाकी ३० हजारापेक्षा जास्त असेल त्यांना ५ हजार रुपये भरून कृषी संजीवनी योजनेत सहभागी करून घेण्याचे बावनकुळे यांनी जाहीर केले आहे. तसेच ज्या शेतकºयांची बिले जास्त आहेत त्यांनी तक्रार नोंदविल्यास त्यांची बिले तपासून ३१ डिसेंबरपर्यंत दुरुस्त करून दिली जातील, असेही आश्वासन दिले आहे. ज्या शेतकरी ग्राहकांना विजेच्या बिलाबाबत अडचणी असतील त्यांनी वीज ग्राहक समितीकडे लेखी तक्रार नोंदवावी, असे आवाहन समितीने केले आहे. सर्व शेतकरी ग्राहकांची बिले तपासणी केली जाणार आहेत. तसेच ज्यांना विनामीटर पुरवठा दिलेला आहे त्या शेतकरी ग्राहकांचा जोडभार तपासला जाणार आहे. बंद मीटरच्या प्रकरणात फिडरनिहाय इनपूट बघून बिल दुरुस्त केले जाणार असल्याचे वीज ग्राहक समितीचे सचिव सिद्धार्थ सोनी यांनी कळविले आहे.

टॅग्स :ministerमंत्रीFarmerशेतकरी