शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाचे आमिषाने नायब तहसीलदाराची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:54 IST

इगतपुरी-त्र्यंबक येथील उपविभागीय कार्यालयातील नायब तहसीलदार उदय गो़ कुलकर्णी (१०, अमेया अपार्टमेंट, गायकवाड मळा, नाशिकरोड) यांची कर्जाच्या आमिषाने आॅनलाइन पद्धतीने ३२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात कुलकर्णी यांनी तक्रार केली आहे़

नाशिक : इगतपुरी-त्र्यंबक येथील उपविभागीय कार्यालयातील नायब तहसीलदार उदय गो़ कुलकर्णी (१०, अमेया अपार्टमेंट, गायकवाड मळा, नाशिकरोड) यांची कर्जाच्या आमिषाने आॅनलाइन पद्धतीने ३२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात कुलकर्णी यांनी तक्रार केली आहे़  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुलकर्णी यांनी एका दैनिकात आलेली कर्जाविषयी जाहिरात वाचली़ या जाहिरातीनुसार कर्जाची आवश्यकता असल्याने त्यांनी मोबाइल क्रमांक (८८२८६०६९१८) वर संपर्क केला़ या मोबाइलवरील वैशाली मोरे या महिलेने कागदपत्रे व बँकेच्या पासबुकची छायांकित प्रत ‘वनकॅपिटल@आऊटलू़ कॉम’ या वेबसाईटवर पाठविण्यास सांगून कर्जासाठी प्रथम दोन हजार ७५० रुपये पंजाब नॅशनल बँकेच्या कल्याण (प़) शाखेत राजेंद्र गायकवाड या व्यक्तीच्या नावावर भरण्यास व पावती मेल करण्यास सांगितले़ त्यानुसार पैसे भरल्यानंतर याच कार्यालयातील दूरध्वनी क्रमांकावरून आनंद कुमार व एका महिलेने कर्ज मंजूर झाल्याचे सांगून तसा ई मेल कुलकर्णी यांना पाठविला़ या मेलवर स्वाक्षरी करून तो मेल पुन्हा पहिल्या ई मेल अकाउंटवर पाठविण्यास सांगितले़ तसेच कर्जाच्या दोन हप्त्याची रक्कम पंजाब नॅशनल बँकेच्या त्याच खात्यात २१ हजार २०० व आठ हजार दोनशे असे भरण्यास सांगितले़ त्यानुसार १४ व १५ मे रोजी कुलकर्णी यांनी ही रक्कम संबंधित गायकवाड नावाच्या व्यक्तीच्या खात्यावर जमा केली़ विशेष म्हणजे ही रक्कम भरत नाही तोपर्यंत कुलकर्णी यांना मोबाइलवर फोन सुरू होते़  कुलकर्णी यांनी बँकेत पैसे भरल्यानंतर कर्जाच्या रकमेसाठी संबंधित मोबाइल नंबरवर फोन केला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही़ त्यामुळे शंका आल्याने त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन ३२ हजार १०० रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार केली़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय