नाशिक - विषारी औषध सेवन करून आत्महत्त्येचा प्रयत्न केलेल्या ठाकूरवाडी येथील तरुणीचा आज उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला़ द्रोपदाबाई महादू उघडे (१६) राहणार ठाकूरवाडी, ता़ त्र्यंबकेश्वर असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे़ तिने राहत्या घरी बुधवारी साडेसात वाजता विषारी औषध सेवन करून आत्महत्त्येचा प्रयत्न केला होता़ तिला तत्काळ घोटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते़ यानंतर आज पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते़ उपचार सुरू असताना दुपारी साडेबारा वाजता तिचा मृत्यू झाला़
विषारी औषध सेवन केलेल्या तरुणीचा मृत्यू
By admin | Updated: November 7, 2014 00:36 IST