नाशिक : कौटुंबिक वादातून पतीने डिझेल टाकून पेटवून दिल्याने ८० टक्के भाजलेल्या राणी नाना काकुळते या विवाहितेचा जिल्हा शासकीय रुग्णालयात रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला़ उपेंद्रनगरमध्ये राहणारा नाना काकुळते (३५) व त्याची पत्नी राणी काकुळते (३०) यांच्यामध्ये बुधवारी वाद झाला. त्यानंतर नाना काकुळते याने पत्नीवर डिझेल टाकून तिला पेटवून दिले़ यामध्ये ८० टक्के भाजल्याने तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ माहेरून पैसे आणावेत यासाठी पतीकडून शारीरिक व मानसिक छळ केला जात होता़ बुधवारी झालेल्या वादानंतर पतीने अंगावर डिझेल टाकून पेटवून दिल्याचा जबाब राणी काकुळते यांनी दंडाधिकाऱ्यांकडे दिला आहे़या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नाना काकुळते विरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. मात्र रविवारी (दि.२२) सकाळी राणी काकुळते यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अंबड पोलिसांनी दिली़ (प्रतिनिधी)
कौटुंबिक वादातून पेटविलेल्या महिलेचा मृत्यू
By admin | Updated: February 23, 2015 00:06 IST