शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

शेकोटीमुळे भाजलेल्या महिलेचा मृत्यू :

By admin | Updated: November 23, 2014 00:34 IST

पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

नाशिक : शहरात दिवसेंदिवस वाढत असलेले डेंग्यूचे रुग्ण व डास यापासून बचाव करण्यासाठी नागरिक विविध क्लृप्त्या अमलात आणत आहेत़ मात्र या क्लृप्त्या नागरिकांसाठी जीवघेण्या ठरत असल्याचे सिन्नर फाट्यावरील घटनेवरून समोर आले आहे़ डास मारण्यासाठी पेटविलेल्या शेकोटीमुळे भाजलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली़ या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी अप्रत्यक्षपणे मच्छरांनीच या वृद्धेचा बळी घेतल्याची चर्चा परिसरात आहे़नाशिकरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिन्नर फाट्यावरील त्रिशरण नगरमध्ये वेणुबाई नारायण खडताळे ही ८० वर्षांची वृद्धा राहते़ सिन्नर फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात डासांचे साम्राज्य पसरले असून, नागरिक सायंकाळी यासाठी विविध उपाययोजना करीत आहेत़ यामध्ये कोणी दरवाजे व खिडक्यांना जाळ्या बसविल्या आहेत, तर कोणी डास प्रतिबंधात्मक उपाय योजले आहेत़ मच्छरांच्या पळवून लावण्यासाठी वेणुबाई रोज सायंकाळी शेकोटीचा धूर करीत असत़ शुक्रवारी रात्री त्यांनी अशीच शेकोटी करून धूर केला़रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास या शेकोटीमुळे वेणुबार्इंच्या कपड्याने पेट घेतल्याने त्या भाजल्या़ त्यांना तत्काळ उपचारासाठी नाशिक महानगरपालिकेच्या बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, या आगीमध्ये त्या सुमारे ९९ टक्के भाजल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले़ याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ खडताळे यांचा मृत्यू जरी शेकोटीने पेट घेतल्याने झाला असला तरी मच्छरांसाठी काही ना काही उपाययोजना या कराव्याच लागतात व त्यांनी त्या केल्या़दरम्यान, सिन्नरफाटा परिसरातील नगरसेवकांनी या भागात वाढलेल्या डासांकडे वेळीच लक्ष दिले असते परिसराची स्वच्छता केली असती तर वेणुबार्इंवर ही परिस्थिती उद्भवली नसली अशी चर्चा परिसरात सुरू आहे़ (प्रतिनिधी)