लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मुंबई - आग्रा महामार्गावरील अमृतधाम चौफुलीवर भरधाव ट्रकने चारचाकीला धडक दिल्यानंतर लोखंडी बॅरिकेड््स तोडून दोन दुचाकींना दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू, तर दुसऱ्या दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि़२६) दुपारच्या सुमारास घडली़ अविनाश श्रावण पाटील (४६, रा़ हनुमाननगर) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे़आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी १२ वाजेच्या सुमारास अमृतधाम चौफुलीवर आडगावकडून येणाऱ्या भरधाव ट्रकचा (एचआर ६९, ए - ००१०) चालक संदीप श्रीपालेराम (रा़पोचाना, नरवाना, जिंद, हरियाणा) याने पुढे असलेल्या टाटा इंडिगो कारला (एमएच १८, डब्ल्यू ९८७१) पाठीमागून धडक दिली,तर इंडिगो कारची पुढील हिरो होंडा पॅशन दुचाकीला (एम एच ४१, ई -५७०२) धडक बसल्याने त्यावरील भारत दशरथ सांगरे आणि मैना दशरथ सांगरे (रा. पवननगर सिडको) हे खाली पडून जबर जखमी झाले़इंडिगो कारला धडक दिलेल्या ट्रकचालकाने यानंतर महामार्गावरील लोखंडी बॅरिकेड््स तोडून सर्व्हिसरोडवर डिस्कव्हर दुचाकीवर (एमएच १५- डीएच ६६८३) बसलेल्या अविनाश श्रावण पाटील (४६, रा़ हनुमाननगर) यांना जोराची धडक दिली. यामध्ये पाटील यांचा जागीच मृत्यू झाला़ दरम्यान, या अपघाताची आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, ट्रकचालकास ताब्यात घेतले आहे़
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
By admin | Updated: June 26, 2017 23:02 IST