लोकमत न्यूज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : भरधाव दुचाकी संरक्षक भिंतीवर आदळून झालेल्या अपघातात दुचाकीवरील युवकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि़ ६) रात्री त्र्यंबकरोडवरील तिरडशेत परिसरात घडली़ सुदीपकुमार विश्वरंजन माहिरी (२५, रा. सोमा वाइन, गंगापूर) असे अपघातात मृत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास सुदीप माहिरी हा यामाहा दुचाकीने (एमएच १५, एफपी ९५३२) त्र्यंबकरोडने सातपूरकडे जात होता़ तिरडशेत परिसरात त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला व तो वाहनासह संरक्षक भिंतीवर जाऊन आदळला. या अपघातात सुदीप माहिरी याचा जागीच मृत्यू झाला़ या अपघाताची सातपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू
By admin | Updated: July 9, 2017 23:53 IST