शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
राजा रघुवंशी यांचा मृत्यू, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
5
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
6
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
7
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
8
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
9
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
10
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
11
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
12
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
14
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
15
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
16
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
17
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
18
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
19
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
20
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे

‘सेल्फी’च्या नादात वालदेवी धरणात बुडून दोघांचा मृत्यू

By admin | Updated: February 14, 2016 00:02 IST

निरोप समारंभ : सिडकोच्या वावरे महाविद्यालयातील बारावीचे विद्यार्थी

नाशिक/ घोटी : महाविद्यालयातील निरोप समारंभानंतर मित्रांसमवेत वालदेवी धरणावर फिरण्यासाठी गेलेल्या दोघा विद्यार्थ्यांचा सेल्फीच्या नादात धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि़१३) दुपारच्या सुमारास घडली़ मूळचा इगतपुरी तालुक्यातील आहुर्लीचा रहिवासी अजिंक्य भाऊसाहेब गायकर (१८, सध्या रा. उपेंद्रनगर, सिडको) व देवराम ऊर्फ सौरभ जगन्नाथ चुळभरे (१८, शालिनीताई बोरसे शाळेजवळ, उत्तमनगर, सिडको) अशी बुडून मरण पावलेल्या युवकांची नावे असून, या प्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ वाडीवऱ्हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडकोतील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या स्व़ शांतारामबापू वावरे महाविद्यालयात शनिवारी बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ होता़ या कार्यक्रमानंतर गायकर, चुळभरे हे आपल्या दहा मित्रांसमवेत वालदेवी धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते़ वालदेवी धरणाच्या प्रवेशद्वाराजवळच दुपारी अडीच वाजेच्या सुमारास चुळभरे हा धरणाजवळील एका दगडावर उभा राहून सेल्फी काढत असताना तोल जाऊन पाण्यात पडला़ यावेळी शेजारीच उभ्या असलेल्या गायकरने त्यास वाचविण्यासाठी उडी घेतली. मात्र, हे दोघेही पाण्यात बुडाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला़ अजिंक्य गायकर हे एकूलता एक मुलगा होता.या घटनेची माहिती मिळताच वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोहर पाटील, हवालदार युवराज अहिरे, मुळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक युवकाच्या मदतीने या दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली़ सायंकाळच्या सुमारास या दोघांचेही मृतदेह सापडल्यानंतर जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले़ वालदेवी धरणात बुडालेले हे दोघेही बारावीच्या वाणिज्य शाखेचे विद्यार्थी होते़ या घटनेमुळे सिडको तसेच आहुर्लीमध्ये शोककळा पसरली आहे़ (प्रतिनिधी)