शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात दोन भावी सनदी लेखापालांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:58 IST

मुंबईमध्ये सनदी लेखापालाचे शिक्षण घेणाऱ्या दोघा भावी सनदी लेखापालांचा मुंबई-आग्रा महामार्गावर गेल्या शुक्रवारी अपघात झाला होता. या अपघातात गंभीरपणे जखमी झालेल्या दोन्ही युवकांचा मंगळवारी (दि.२४) वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

इंदिरानगर : मुंबईमध्ये सनदी लेखापालाचे शिक्षण घेणाऱ्या दोघा भावी सनदी लेखापालांचा मुंबई-आग्रा महामार्गावर गेल्या शुक्रवारी अपघात झाला होता. या अपघातात गंभीरपणे जखमी झालेल्या दोन्ही युवकांचा मंगळवारी (दि.२४) वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, इंदिरानगर परिसरातील आदर्श सोसायटी व सारंगीनगर परिसरात राहणारे सुश्रुत नयन पाटील (२३), कुणाल भरत खिंवसरा (२१) हे दोन्ही मित्र शुक्रवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास चारचाकी मोटारीने (एमएच १५ डीएम.१६११ ) उड्डाणपुलावरून जात होते. यावेळी अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारीला ओव्हरटेक करताना जोरदार धडक दिली. या धडकेत दोघे गंभीर जखमी झाले होते. दोघांवर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू होते. दोघेही सनदी लेखापाल अभ्यासक्रमाच्या अखेरच्या वर्षाला शिकत होते. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वासननगर परिसरात एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दोघे गंभीर जखमी झाले होते. अज्ञात वाहनचालकाविरुद्ध पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. सुश्रुत व कुणाल दोघांच्या डोक्याला जबर मार लागला होता.  दरम्यान, मंगळवारी पुढील उपचारासाठी कुणालला मुंबईला हलविण्यात आले होते; मात्र महामार्गावरून जात असताना वाटेत त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेने संपूर्ण इंदिरानगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत. अचानकपणे दोघा युवकांचा एकाच दिवशी अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण इंदिरानगर परिसरात शोककळा पसरली आहे. कुणाल हा अशोका शाळेचा माजी विद्यार्थी होता. तो नाशिक येथे सनदीलेखापालाचे प्रशिक्षण घेण्यासाठी आर्टीकलशिप करत होता. तसेच पाटील हा पुण्यामध्ये आर्टीकलशिप करत होता. हे दोघे पुढील काही महिन्यात सिएची अंतीम परिक्षा देणार होते.

टॅग्स :Accidentअपघात