शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

नाशिकच्या वारकऱ्याचा वाहनाच्या धडकेने राहात्यात मृत्यू

By admin | Updated: June 18, 2017 14:08 IST

या दिंडीतील वारकऱ्यांना दुख:द अंतकरणाने वारीतून माघारी परतावे लागले़

राहाता : येथे अज्ञात वाहनाने वारकऱ्याला चिरडल्याने नाशिक येथून आलेल्या तुकारम महाराज खेडलेकर दिंडीतील वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला़ त्यामुळे या दिंडीतील वारकऱ्यांना दुख:द अंतकरणाने वारीतून माघारी परतावे लागले़तुकाराम महाराज खेडलेकर (खेडले झुंगी, ता़ निफाड, जि़ नाशिक) हे गेल्या २० वर्षांपासून पंढरपूरला पायी दिंडी नेतात़ या वर्षी ही दिंडी नगरमार्गे पंढरपूरकडे जाण्यास खेडले झुंगी येथून १६ जून रोजी मार्गस्थ होऊन पहिला मुक्काम देऱ्हडे मढी येथे झाला़ त्यानंतरचा दुसरा मुक्काम शनिवारी राहाता येथे झाला़ दरम्यान रविवारी सकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास दिंडीतील वारकरी पुढील प्रस्थानाची तयारी करीत होते़ त्याचवेळी दिंडीतील वारकरी दौलत शंकर गवळी (वय ६५, रा़ नारायन टेभे, ता़ निफाड) हे शौचालयासाठी निघाले असताना राहाता येथील न्यायालयासमोर नगर-मनमाड महामार्ग पार करीत असताना नगरकडून शिर्डीकडे जाणाऱ्या भरगाव लक्झरीने गवळी यांना जोरदार धडक दिली़ या अपघातात गवळी गाडीखाली चिरडले गेले़ यात त्यांचा जागीच अंत झाला़ घटनेची माहिती मिळताच राहाता पोलिसानी घटनास्थळी दाखल होत पचंनामा केला़ शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर दिंडीतील वारकऱ्यांना दुख:द अंतकरणाने पंढरपूरकडे मार्गस्थ व्हावे लागले़ तर दिंडीतील नारायण टेभे गावातील सुमारे ५० वारकऱ्यांना वारी अर्धवट सोडून माघारी परतावे लागले़