शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

सातपूरच्या दुहेरी हत्याकांडातील आरोपीची फाशीची शिक्षा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 00:44 IST

सातपूरच्या शिवाजीनगर कार्बननाका येथे राहणाऱ्या पल्लवी संसारे (३४) व मुलगा विशाल (७) या दोघांच्या दुहेरी हत्याकांडात जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेले रामदास शिंदे याची मुंबई उच्च न्यायालयाने खटल्यातून निर्दाेष मुक्तता केली आहे.

नाशिक : सातपूरच्या शिवाजीनगर कार्बननाका येथे राहणाऱ्या पल्लवी संसारे (३४) व मुलगा विशाल (७) या दोघांच्या दुहेरी हत्याकांडात जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेले रामदास शिंदे याची मुंबई उच्च न्यायालयाने खटल्यातून निर्दाेष मुक्तता केली आहे. ज्या परिस्थितीजन्य पुराव्यावर जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले होते, पुराव्यांनाच उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्यात न्यायालयाने उपरोक्त निर्णय दिला.१८ एप्रिल २०१६ मध्ये ही घटना घडली होती. संशयित रामदास शिंदे याच्या घरात भाडेकरू म्हणून राहत असलेल्या पल्लवी संसारे व मुलगा विशाल यांचा हत्याकांड करण्यात आले होते. त्यानंतर पल्लवीेचे पती कचरू संसारे यांनी फिर्याद दिली होती. घरमालक रामदास शिंदे हा फरार असल्याने त्याच्यावर संशय बळावला होता व नंतर त्याला अटक करून त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने गेल्या वर्षी २६ एप्रिल २०१८ रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी रामदास शिंदे यास फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याविरुद्ध शिंदे याच्या वतीने अ‍ॅड. अनिकेत निकम यांनी उच्च न्यायालयात अपील केले, त्याची सुनावणी झाली. सरकारपक्षातर्फे श्ािंदे याच्याविरुद्ध सादर करण्यात आलेले पुराव्यांवरच अ‍ॅड. निकम यांनी संशय व्यक्तकरून आरोपीला फाशी ठोठावण्या इतपत कोणताच पुरावा न्यायालय पुढे नाही, तसेच खटल्यात कोणताच प्रथमदर्शनी साक्षीदार नसून संपूर्ण केस परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित आहे आणि परिस्थितीजन्य पुराव्याची सबळ साखळी सरकारी वकिलांनी कोर्टात मांडली नाही आणि अशा परिस्थितीत रामदास शिंदे यास फाशीची शिक्षा देणे चुकीचे असून, त्यांची निर्दोेष मुक्तता करण्यात यावी, असा युक्तिवाद केला व त्याच्या पुराव्यादाखल काही निवाडेही सादर केले. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती बी. पी. धर्माधिकारी, प्रकाश नाईक यांनी शिंदे याची दुहेरी हत्याकांडातून निर्दोष मुक्तता केली.खटल्यात स्पेक्ट्रोग्रापीची टेस्टया खटल्यात पहिल्यांदाच आरोपीच्या आवाजाची स्पेक्ट्रोग्रापी टेस्ट घेण्यात आली होती. त्याचे पुरावे जिल्हा न्यायालयासमोर सादर करण्यात आले होते. परंतु ज्या दिवशी घटना घडली त्यावेळी अन्य नागरिकांना कोणताही आवाज आला नसल्याची बाब न्यायालयापुढे मांडण्यात आली. मयत दोन्ही मायलेकावर एकूण ५४ घाव करण्यात आले, त्यावेळी आरडाओरड झाली असती. असा प्रश्न अनुत्तरित असल्याचे न्यायालयासमोर मांडण्यात आले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयCrime Newsगुन्हेगारी