शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात परमोरीच्या बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 01:47 IST

तालुक्यातील परमोरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात तीनवर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून, या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दिंडोरी तालुक्यात गेल्या दोन वर्षांतील ही तिसरी घटना आहे.

दिंडोरी : तालुक्यातील परमोरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात तीनवर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून, या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दिंडोरी तालुक्यात गेल्या दोन वर्षांतील ही तिसरी घटना आहे.  याबाबत मिळालेली माहिती अशी, परमोरी शिवारात ज्ञानेश्वर दिघे यांच्या टमाटाच्या शेतात कुटुंबातील महिला सदस्य काम करत होत्या. शेजारीच लहान मुलेही खेळत होते. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शेजारील उसातून बिबट्याने तेथे खेळत असलेल्या सार्थक ज्ञानेश्वर दिघे (वय ३) याच्यावर हल्ला चढवला आणि त्याच्या मानेचा लचका पकडत त्याला उसाच्या शेतात ओढत नेले. सदर घटना समजताच सार्थकची आई व आजीने आरडाओरडा सुरू केला. त्यामुळे आजूबाजूचे शेतकरी जमा झाले आणि त्यांनी उसात शोध घेतला असता बिबट्याने धूम ठोकली. जखमी सार्थक यास तातडीने दवाखान्यात उपचारास नेण्यात आले; परंतु दिंडोरी ग्रामीण रु ग्णालयातील डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार नरहरी झिरवाळ यांनी वनविभागाला सूचना देत तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. यापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात म्हेळुस्के येथे श्रीरंग हर्षवर्धन खिरकाडे व लखमापूर येथील विवेक बिंद या बालकांचा मृत्यू झाला होता.भय इथले संपत नाहीदिंडोरी तालुक्यातील कादवा कोलवन नदीकिनारी परिसरातील सर्व गावे गेल्या अनेक वर्षांपासून बिबट्यांच्या दहशतीखाली असून, आतापर्यंत तीन बालकांचा जीव गेला आहे. दोन बालकांसह एक महिलेवरही हल्ला झाला होता. सुदैवाने त्या बचावल्या. याशिवाय बिबट्यांनी अनेकांची  पाळीव प्राणी फस्त केले आहेत. बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी डझनभर पिंजरे लावले आहेत. मात्र भीती कमी होण्याऐवजी ती दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या रविवारीच एक शेतकऱ्याच्या वासरावर बिबट्याने हल्ला केला होता. ग्रामस्थांनी वनविभागाला कळवले; परंतु त्यावर उपाययोजना झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

टॅग्स :leopardबिबट्याDeathमृत्यू