शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाच्या धडकेने वानराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 23:43 IST

पाथरे : सिन्नर-शिर्डी महामार्गावरील पाथरेजवळील महानुभव आश्रमासमोर अज्ञात वाहनाच्या धडकेने एका वानराचा मृत्यू झाला. हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी पाथरे गावात सहा वानरांचा समूह आला होता. गावात दोन दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर ही वानरे महामार्गाच्या पलीकडे एकत्रित जात असताना अज्ञात वाहनाची धडक लागून त्यातील एक वानर जागीच ठार झाले.

ठळक मुद्देभविष्यात दफन केलेल्या जागेवर वानराचे मंदिर उभारण्याचा सूर

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरे : सिन्नर-शिर्डी महामार्गावरील पाथरेजवळील महानुभव आश्रमासमोर अज्ञात वाहनाच्या धडकेने एका वानराचा मृत्यू झाला. हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी पाथरे गावात सहा वानरांचा समूह आला होता. गावात दोन दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर ही वानरे महामार्गाच्या पलीकडे एकत्रित जात असताना अज्ञात वाहनाची धडक लागून त्यातील एक वानर जागीच ठार झाले.आपला सवंगडी रस्त्यावर पडलेला पाहून बाकीची पाच वानरे त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होते. हे दृश्य रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांनी बघितले आणि घटनेची खबर गावात पोहोचली. गावातील मोजक्या तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. गर्दी होऊ नये म्हणून काही कार्यकर्त्यांनी गर्दीला रोखले. या घटनेची बातमी वनक्षेत्रपाल पी. बी. सोनवणे, वनपाल सरोदे, इरकर व पशुवैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आली. वनविभागाचे कर्मचारी नारायण वैद्य यांनी पंचनामा केला. वावीचे पशुवैद्यकीय अधिकारी अविनाश पवार यांनी शवविच्छेदन केले. वानराचा मृतदेह गावातील हनुमान मंदिरात आणण्यात आला. मंदिराजवळील मोकळ्या जागेत वानराचा दफनविधी करण्यात आला. यावेळी बाकीचे शोकाकुल वानरे मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या झाडांवर बसून होते. मुक्याप्राण्यांच्या संवेदनेने ग्रामस्थही गहिवरून गेले. या घटनेची खबर गावात पोहोचताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. हनुमान जयंतीच्या दिवशी प्रत्यक्ष हनुमंतरायाने गावाला दर्शन दिले अशी ग्रामस्थांची, प्राणीमित्रांची भावना झाली.मंदिर उभारणार वानराचा दफनविधी झाल्यानंतर हनुमंताला प्रणाम करून प्रत्येक जण आपापल्या घरी निघून गेला, भविष्यात दफन केलेल्या जागेवर वानराचे मंदिर उभारण्याचा सूर उपस्थितांमधून ऐकू येत होता.

टॅग्स :AccidentअपघातMonkeyमाकड