नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रक, दुचाकी व मिनी बस या तिहेरी अपघातात आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना ११ सप्टेंबरला सकाळी घडली होती़ या अपघातात गंभीर जखमी झालेली व मुंबईतील जे़ जे़ रुग्णालयात उपचार सुरू असलेली निकिता खंदारे या नऊ वर्षीय मुलीचा शुक्रवारी (दि़ २५) पहाटे मृत्यू झाला आहे़ या अपघातात जखमी झालेली निकिताची आई व दोन बहिणींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ खंदारे कुटुंबातील सहा जण यामध्ये जखमी झाले आहेत़आडगावकडे जाणाऱ्या मालट्रकने (एमपी ०६ एच सी ०९६३) रस्त्यातील सॅन्ट्रो कार, मिनी बस, दुचाकी व दुभाजकाजवळ बसची वाट पाहत असलेल्या खंदारे कुटुंबीयांना धडक दिली होती़ यामध्ये परभणी जिल्ह्यातील रंजना खंदारे (४२), निकिता खंदारे (९), मायावती खंदारे (८), प्रजापती खंदारे (३), आरुषी खंदारे (२), समर्थ खंदारे (२) व दुचाकीवरील पंढरीनाथ डांगे (५३), मारुती तारभाले (३०) हे जखमी झाले होते़ अमृतधाम परिसरात होणाऱ्या अपघातांच्या मालिकांमुळे संपूर्ण उड्डाणपुलाच्या मागणीसाठी नागरिकांनी रास्ता रोकोचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांच्यावर अमानुषपणे लाठीमार केला होता.
अमृतधाम अपघातातील जखमी मुलीचा मृत्यू
By admin | Updated: September 25, 2015 23:53 IST