ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. १८ - इगतपुरी तालुक्यातील निरपन येथील दोन आदिवासी सख्ख्या भावाना शनिवारी रात्री झोपेत सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान या घटने मुळे तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान इगतपुरी तालुक्यात गेली महिन्याभरापासून अनेकांना सर्पदंश झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
इगतपुरी तालुक्यातील निरपन येथील भले कुटुंबीय शनिवारी जेवण आटोपून घरात झोपले असता, गणेश गोविंद भले (वय २८ ) व् रामदास गोविंद भले (वय २४ ) या सख्ख्या भावाना झोपेतच सर्पदंश झाला यामुळे त्यांचा तरुणाचा रात्रीच्या गाढ़ झोपेत मृत्यु झाला.
रात्री आपल्या कुटुंबा सोबत एकत्रित जेवण करत रात्री १० वाजेच्या सुमारास झोपले असता,पहाटे नेहमीप्रमाणे कामानिमित्त झोपेतून उठवण्या करिता आई सोनाबाई गोविंद भले ह्या गेल्या असता दोनिहि तरुण उठण्यास प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात येताच आईने मोठ्याने हंबरडा फोडत परिसरात याबात माहिती देत यावेळी परिसरातील सर्व आदिवासी बांधव एकत्र येत उठवण्याचा प्रयत्न करू लागले.
मात्र कुठलाही प्रतिसाद देत नसल्याने त्यांना तातडीने घोटी येथील ग्रामीण रुगणल्यात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश घोलप यांनी तपासणी केली असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. दोघाचीही लग्न झालेली असून मयत गणेश ह्यास एक मुलगा दोन मूली असून तर रामदास ह्यास एक मुलगी आहे. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.