नाशिकरोड : अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या रामनाथ कचरू वारुंगसे (६१) यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. येथील गंधर्वनगरी परिसरात राहणारे वारुंगसे हे आपल्या मित्रांसोबत अमरनाथ यात्रेला गेले होते. दर्शन आटोपून पंचतरणीला आल्यावर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांचा मृतदेह रविवारी रात्री नाशिकरोड येथे आणण्यात आला. दसक येथील अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, दोन मुलगे असा परिवार आहे. (प्रतिनिधी)