नाशिकरोड : देवळालीगाव येथील सेवानिवृत्त प्रेस कामगार व पोलीसमित्र तानाजी पुंडलिक खेलूकर (६८) हे नर्मदा परिक्रमासाठी जात असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.गुजरातमधील भरूच येथे एका मंदिरात दर्शनासाठी जात असताना गुरुवारी सकाळी खेलूकर यांचा पाय घसरल्याने ते डोक्यावर पडून गंभीर जखमी होऊन मयत झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, चार मुली, नातवंडे असा परिवार आहे.
नर्मदा परिक्रमातील भाविकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 01:06 IST