नाशिक : घरासमोरील ओट्यावरू खाली पडून जखमी झालेल्या बालकाचा उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाला़ रविवारी दुपारच्या सुमारास हरसूल येथे ही घटना घडली होती़ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथे राहणारे रामदास गावित यांचा एक वर्षाचा मुलगा प्रीतम हा रविवारी दुपारच्या सुमारास घरासमोरील ओट्यावर खेळत होता़ यादरम्यान त्याचा तोल जाऊन तो ओट्यावरून खाली पडून जखमी झाला़ त्यास तातडीने हरसूल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ सोमवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला़ या प्रकरणी हरसूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)
हरसूलला ओट्यावरून पडून बालकाचा मृत्यू
By admin | Updated: November 11, 2014 00:01 IST