शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात स्वाइन फ्लूसदृश आजाराने दोघांचा मृत्यू; १६ रुग्णांवर उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 00:25 IST

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षामध्ये उपचार सुरू असलेल्या निफाड व मालेगाव तालुक्यातील दोघांचा स्वाइन फ्लूसदृश आजाराने मृत्यू झाला. संदीप भास्कर सोळसे (३०, रा. शिरसगाव, ता. निफाड) व सुरेश सोनू थोरात (४२, रा. आघार खुर्द, ता. मालेगाव) अशी मृत्यु झालेल्या दोघा रुग्णांची नावे असून, आतापर्यंत १८ जणांचा या स्वाइन फ्लूने बळी घेतला आहे़

ठळक मुद्देसहा नवीन रुग्ण दाखल झाले

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षामध्ये उपचार सुरू असलेल्या निफाड व मालेगाव तालुक्यातील दोघांचा स्वाइन फ्लूसदृश आजाराने मृत्यू झाला. संदीप भास्कर सोळसे (३०, रा. शिरसगाव, ता. निफाड) व सुरेश सोनू थोरात (४२, रा. आघार खुर्द, ता. मालेगाव) अशी मृत्यु झालेल्या दोघा रुग्णांची नावे असून, आतापर्यंत १८ जणांचा या स्वाइन फ्लूने बळी घेतला आहे़शिरसगाव येथील रहिवासी सोळसे यांना शनिवारी (दि़ ८) जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ त्यांना निमोनिया झाल्याचे निदान वैद्यकीय तपासणीत समोर आल्याने तसेच त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते़ बुधवारी (दि़१२) मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला़, तर आघार खुर्द येथील थोरात यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याने सोमवारी (दि़१०) सायंकाळी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ व्हेंटिलेटरवर असलेल्या थोरात यांचा बुधवारी (दि़ १२) सकाळी मृत्यू झाला़ जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात १६ रुग्णांवर उपचार सुरू असून, यातील तीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत़, तर उर्वरित १३ रुग्णांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाही़ दरम्यान, या कक्षामध्ये सहा नवीन रुग्ण दाखल झाले आहेत़

जिल्ह्यात स्वाइन फ्लूसदृश आजाराने दोघांचा मृत्यू; १६ रुग्णांवर उपचार सुरूनाशिक : जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षामध्ये उपचार सुरू असलेल्या निफाड व मालेगाव तालुक्यातील दोघांचा स्वाइन फ्लूसदृश आजाराने मृत्यू झाला. संदीप भास्कर सोळसे (३०, रा. शिरसगाव, ता. निफाड) व सुरेश सोनू थोरात (४२, रा. आघार खुर्द, ता. मालेगाव) अशी मृत्यु झालेल्या दोघा रुग्णांची नावे असून, आतापर्यंत १८ जणांचा या स्वाइन फ्लूने बळी घेतला आहे़शिरसगाव येथील रहिवासी सोळसे यांना शनिवारी (दि़ ८) जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ त्यांना निमोनिया झाल्याचे निदान वैद्यकीय तपासणीत समोर आल्याने तसेच त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते़ बुधवारी (दि़१२) मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला़, तर आघार खुर्द येथील थोरात यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याने सोमवारी (दि़१०) सायंकाळी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ व्हेंटिलेटरवर असलेल्या थोरात यांचा बुधवारी (दि़ १२) सकाळी मृत्यू झाला़ जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात १६ रुग्णांवर उपचार सुरू असून, यातील तीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत़, तर उर्वरित १३ रुग्णांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाही़ दरम्यान, या कक्षामध्ये सहा नवीन रुग्ण दाखल झाले आहेत़