मालेगाव : २००६च्या मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी शब्बीर अहमद मसीउल्लाहच्या (४२) अंगावर सोमवारी भिंत कोसळल्यामुळे गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला, तर त्याचा मुलगा महास अर्कम शब्बीर अहमद जखमी झाला. शब्बीर अहमदच्या राहत्या घरी नूरबाग येथे त्याच्या अंगावर संरक्षक भिंत कोसळली. डोक्याला जबर मार लागल्याने त्याला उपचारार्थ सामान्य रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. मसीउल्लाह याच्यावर २००६ बडा कब्रस्तान येथे झालेल्या बॉम्बस्फोटाचा आरोप होता. याप्रकरणी त्याच्यावर मुंबई मोक्का कोर्टात खटला चालू आहे. नोव्हेंबर २०११मध्ये त्याच्यासह सहा आरोपींची जामिनावर मुक्तता झाली आहे. (प्रतिनिधी)
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपीचा मृत्यू
By admin | Updated: March 3, 2015 00:22 IST