शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

झोक्याचा फास बसून दहा वर्षीय बालिकेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 01:36 IST

सिडको : घरात मुलींसोबत झोका खेळत असताना अचानक दोरी तुटून त्याचा फास बसल्याने दहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि़११) दुपारी चुंचाळे शिवारात घडली़ तितिक्षा किरण राऊळ (रा. रो-हाऊस नंबर ५७३, जाधव टाऊनशिप, चुंचाळे शिवार, नाशिक) असे दुर्दैवी मुलीचे नाव आहे़ या घटनेची अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़

ठळक मुद्देचुुंचाळे शिवारातील घटना घटनेची अंबड पोलीस ठाण्यात नोंद

सिडको : घरात मुलींसोबत झोका खेळत असताना अचानक दोरी तुटून त्याचा फास बसल्याने दहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि़११) दुपारी चुंचाळे शिवारात घडली़ तितिक्षा किरण राऊळ (रा. रो-हाऊस नंबर ५७३, जाधव टाऊनशिप, चुंचाळे शिवार, नाशिक) असे दुर्दैवी मुलीचे नाव आहे़ या घटनेची अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घरातील बेडरूममध्ये बांधलेल्या झोक्यावर तितिक्षासह आणखी दोन मुली झोका खेळत होत्या़ दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास झोक्याचा एक पदर तुटला व त्याचा फास तितिक्षाच्या गळ्याभोवती बसला़ ही बाब लक्षात येताच तिचे वडील किरण राऊळ यांनी तिला उपचारासाठी प्रथम घराजवळील खासगी रुग्णालय व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ़ गायधनी यांनी तपासून मयत घोषित केले़पोलीस आयुक्तालयातील प्रशासन विभागात लिपिक म्हणून कार्यरत असलेले किरण राऊळ यांची तितिक्षा ही मुलगी आहे़ या घटनेमुळे जाधव टाऊनशिप परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे़ दरम्यान, दोन आठवड्यांपूर्वीच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथील आदिवासी पाड्यावरील बारा वर्षीय मुलीचा झोका खेळत असताना गळफास बसून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती़सिडको परिसरात यापूर्वी एका लहान मुलाच्या घशात रबराचा फुगा अडकल्याने तर नाशिकरोड परिसरात दहा रुपयांचे नाणे घशात अडकल्याने मुलीचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती़ लहान मुले घरात खेळत असताना पालकांनी त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे़- मधुकर कड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंबड