शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

देवळा बसस्थानकास खासगी वाहनांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 11:26 PM

देवळा : येथील बसस्थानकास रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी खासगी वाहनांचा विळखा पडत असल्यामुळे बसस्थानकात येणाऱ्या व जाणाºया बस तसेच प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. अपघात होण्याची शक्यता असल्याने परिवहन विभागाने याबाबत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

ठळक मुद्देबसचालकांची कसरत : आठवडे बाजाराच्या दिवशी प्रवाशांची गैरसोय

देवळा : येथील बसस्थानकास रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी खासगी वाहनांचा विळखा पडत असल्यामुळे बसस्थानकात येणाऱ्या व जाणाºया बस तसेच प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. अपघात होण्याची शक्यता असल्याने परिवहन विभागाने याबाबत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.देवळा हे चौफुलीवर वसलेले शहर असून, येथून राज्य व आंतरराज्य बसेसची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. संपूर्ण नाशिक जिल्ह्यात खड्डेमुक्त बसस्थानक म्हणून पूर्वीपासून या बसस्थानकाची ख्याती आहे. विंचूर-प्रकाशा महामार्गापासून १०० मीटर अंतरावर असलेल्या देवळा बसस्थानकात दिवसभरात ४५० बसेसची ये-जा सुरू असते. नाशिक, नंदुरबार, साक्री, सटाणा, सुरत, पुणे, मुंबई, नगर, धुळे, जळगाव आदी आगारांच्या बसेसची दिवसभर ये-जा सुरू असते. यामुळे बसस्थानक सतत गजबजलेले असते. रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी स्थानकात प्रवाशांची गर्दी असते. आठवडे बाजारासाठी ग्रामीण भागातून ग्रामस्थ मोठ्या संख्येने बाजारहाट करण्यासाठी देवळा येथे येतात. यापैकी अनेकजण आपल्या दुचाकीने येतात. शहरात पार्किंगची सुविधा नसल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या दुचाकी बसस्थानक आवारात उभ्या करतात. यामुळे स्थानक दुचाकींनी भरून जाते.स्थानकाच्या प्रवेश मार्गावरच अनेक भाजीपाला विक्र ेते वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने रस्ता अडवून बसतात. या प्रवेश मार्गासमोरूनच आठवडे बाजारात जाण्याचा रस्ता असल्यामुळे या ठिकाणी गर्दी असते. पोलीस या ठिकाणी बॅरिकेड्सचा वापर करीत नसल्यामुळे सर्वत्र बेशिस्त निर्माण होते. यामुळे बसचालकांना या गर्दीतूनच वाट काढत स्थानकात प्रवेश करावा लागतो. त्यातच खासगी वाहनेदेखील स्थानकात ये-जा करतात. यामुळे येणाºया वजाण्याºया बसला अडथळे निर्माण होतात. परिवहन महामंडळ विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे नागरिकांसह प्रवाशांची गैरसोय होत आहे.पार्किंगची व्यवस्था करण्याची मागणीस्वच्छ व सुंदर देवळा या संकल्पपूर्तीकडे वाटचाल करीत असलेल्या देवळा नगरपंचायतीच्या वतीने शहरात विविध विकासकामे सुरू आहेत. यामुळे शहराचे रूप पालटू लागले आहे. शहराचे होत असलेले विस्तारीकरण व वाहनांची वाढती संख्या पाहता शहरात पार्किंगसाठी लवकरात लवकर जागा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. कारण शहरातील सुभाष चौक, पाच कंदील, बसस्थानक परिसरात वाहनचालक आपली वाहने बेशिस्तपणे उभी करतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. देवळा नगरपंचायत प्रशासनाने शहरातील पार्किंगचा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.