शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
5
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
6
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
7
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
8
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
9
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
10
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
11
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
12
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
13
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
14
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
15
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
16
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
17
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
18
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
19
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
20
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
Daily Top 2Weekly Top 5

जीवघेणा प्रवास : नांदूरशिंगोटे महामार्गावरील दुरावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 01:04 IST

नांदूरशिंगोटे : नाशिक - पुणे राष्ट्रीय महामार्गावर तसेच नांदूरशिंगोटे गावातून जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. गावाला जोडणाऱ्या बहुतांश रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य झाल्याने जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. संबंधीत विभागाने रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी होत आहे.

ठळक मुद्देरस्त्यावर केवळ खड्डेच-खड्डे

नांदूरशिंगोटे : नाशिक - पुणे राष्ट्रीय महामार्गावर तसेच नांदूरशिंगोटे गावातून जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. गावाला जोडणाऱ्या बहुतांश रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य झाल्याने जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. संबंधीत विभागाने रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी होत आहे.नाशिक - पुणे हा राष्ट्रीय महामार्ग पुर्वी नांदूरशिंगोटे गावातून जात होता. परंतु गेल्या चार वर्षांपासून रस्त्याचे चौपदरीकरण झाल्याने बाह्यवळण रस्ता गावाच्या बाहेरून गेला आहे. त्यामुळे रस्त्यावरील वर्दळ कमी झाली असली तरी परिसराला जोडणाऱ्या रस्ते मोठ्या प्रमाणात आहे. नांदूरशिंगोटे गावातून जाणाऱ्या महामार्गावरील निमोण नाका, सिन्नर व संगमनेर कडे जाणाऱ्या मुख्य रस्ता, चास नाका, निमोण रोड आदी ठिकाणी सर्वत्र खड्डेच खड्डे झाल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे. दीड ते दोन फूटापर्यंत खड्डे असल्याने वाहन चालविताना कसरत करावी लागते. नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर गावातील नागरिकांना दळणवळणासाठी रस्त्याचा दोन्ही बाजूंनी सर्व्हिस रोड ठेवण्यात आले आहे. सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने अवजड वाहनांना नुकसान सोसावे लागत आहे. अनेकदा रात्रीच्या वेळेस रस्त्यावरील खड्डे लक्षात न आल्याने दुचाकीवरुन घसरण्याचे प्रकार घडले आहेत. नांदूरशिंगोटे ते निमोण रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाल्याने या भागातील नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. निमोण रस्त्यावर जागोजागी खड्डे असल्याने प्रवाश्यांची मोठी गैरसोय होत आहे. सध्या शाळा, महाविद्यालय, मंदिरे, पर्यटन स्थळे बंद असल्याने विद्यार्थी व भाविकांची ये - जा बंद आहे. सुरळीत झाल्यानंतर त्यांनाही रस्त्यावरील खड्यखतून वाट शोधताना कसरत करावी लागले. संबंधीत विभाग व रस्ते विकासक कंपनीने तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

वाहन चालकांची कसरतसिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ असून दररोज पंधरा ते वीस गावांचा खरेदी विक्रीसाठी संपर्क येतो. तसेच संगमनेर, अकोला, लोणी, कोपरगाव, श्रीरामपूर, पुणे आदी भागात जाण्यासाठी येथून पर्यायी व्यवस्था असल्याने नेहमीच दळणवळण असते. गेल्या दोन ते तीन महिन्यापासून सुरु असलेल्या पावसाने या भागातील रस्त्यांंची वाट लागली आहे. रस्त्यात खड्डा कि खड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यावरील खड्यांमध्ये वाढ झाली आहे. खड्यांची डागडुजी होणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे.-रामदास सानप, ग्रामस्थफोटो ओळी :

नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या सर्व्हिस रोडवरील जीवघेणा खड्डा. तर दुसऱ्या छायाचित्रात नांदूरशिंगोटे गावातून संगमनेर जाणाऱ्या रस्तावर निमोणनाका येथील खड्डेच खडे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग