शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

नोंदणीची आज शेवटची मुदत

By admin | Updated: June 17, 2017 01:01 IST

नशिक : विभागातून अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमासाठी शुक्रवारपर्यंत (दि.१६) सुमारे १४ हजार ६१४ अर्ज निश्चित झाले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कनशिक : विभागातून अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमासाठी शुक्रवारपर्यंत (दि.१६) सुमारे १४ हजार ६१४ अर्ज निश्चित झाले असून, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी ९ हजार ३१८ अर्ज निश्चित झाले आहेत. तर हॉटेल व्यवस्थापन प्रवेशासाठी ११०व स्थापत्यशास्त्र अभ्यासक्रम प्रवेशासाठी ४४३ अर्ज निश्चित झाले आहेत. तंत्रशिक्षण पदवी प्रवेशासाठी आॅनलाइन नोंदणी करणाऱ्यांसह कागदपत्रांची पडताळणी व अर्जात दुरुस्ती करण्याची शनिवारी (दि.१७) अखेरची मुदत असल्याने अभियांत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमास प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांची विविध सुविधा कें द्रावर अर्ज भरण्यासाठी रीघ लागणार आहे.आॅनलाइन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना नाशिकसह विभागातून अभियांत्रिकीचे (४६), औषधनिर्माणशास्त्राचे (३५), हॉटेल व्यवस्थापन (२) व स्थापत्य शास्त्र (५) सुविधा केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तंत्रशिक्षण संचालनालयाने केलेल्या सूचनेनुसार पदविका, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीची प्रवेशप्रक्रिया केंद्रीभूत पद्धतीने राबविण्यात येत असून, या प्रक्रियेतून संस्थास्तरावरील प्रवेशासाठी उपलब्ध जागांवर प्रवेशासाठी संकेतस्थळावर आॅनलाइन पद्धतीने अर्ज करण्यास विद्यार्थ्यांनी सोमवारपासूनच (दि.५) सुरुवात केली आहे. ज्या विद्यार्थ्यांची अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, अशा विद्यार्थ्यांनी सुविधा केंद्रांवर (फॅसिलिशन सेंटर) अर्ज निश्चत व प्रमाणपत्रांची पडताळणी करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज निश्चित करून प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणीही करून घेतली आहे. अर्ज निश्चित करून प्रमाणपत्रांची पडताळणी करणाऱ्या विद्यार्थ्यांचेच नाव सक्षम प्राधिकारी यांनी तयार केलेल्या गुणवत्ता यादीमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. यंदा अभियांत्रिकी औषधनिर्माणशास्त्र वैद्यकीय व दंतवैद्यकीय राज्य सामायिक परीक्षा कक्षातर्फे सीईटी घेण्यात आली होती. सीईटी परीक्षेच्या निकालासोबतच इंजिनिअरिंग प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, त्यानुसार १७ जूनपर्यंत आॅनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत आहे. १७ जूनपर्यंतच अर्ज व कागदपत्र पडताळणी करता येणार आहे. १९ जूनला प्रोव्हिजनल मेरीट लिस्ट जाहीर होणार असून, २२ जूनला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.