शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
2
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
3
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
4
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
5
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
6
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
7
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
8
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
9
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
10
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
11
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
12
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
13
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
14
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
15
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
16
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
17
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
18
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
19
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
20
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक

नळातून आला मृत मासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2016 00:17 IST

सिडकोतील घटना : नागरिकांचे आरोग्य धोक्यात

 सिडको : प्रभाग क्रमांक ४३ मधील स्वामी विवेकानंदनगर भागातील एका नागरिकाकडे चक्क नळातून मृत मासा बाहेर आला. गेल्या दोन दिवसांपासून या भागात दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असून, याबाबत नागरिकांनी नगरसेवक अ‍ॅड. अरविंद शेळके यांच्या लक्षात सदर बाब आणून दिली. मनपाच्या सिडको पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून, याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची अपेक्षा सिडकोवासीयांनी केली आहे.सिडको प्रभाग क्रमांक ४३ मधील स्वामी विवेकानंदनगर भागासह परिसरात गेल्या दोन दिवसांपासून दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असून, आज एका नागरिकाच्या घरातील पिण्याच्या पाण्यात चक्क मृत मासाच आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सिडकोतील काही भागात ड्रेनेजमिश्रित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या आठवड्यात सावतानगर भागात पाणीकपातीच्या दिवसानंतर दुसऱ्या दिवशीही पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. याबरोबरच गेल्या आठ दिवसांपासून सिडकोतील पंडितनगर, शिवपुरी चौक यांसह परिसरातही नागरिकांना ड्रेनेजमिश्रित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिसरातील नागरिकांनी नगरसेवक रत्नमाला राणे व भूषण राणे यांना सदर बाब सांगितली. राणे यांनी जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत नागरिकांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, असे अधिकाऱ्यांना सांगितले.आज पुन्हा सिडकोतील स्वामी विवेकानंद भागात नळावाटे मृत मासा आढळून आल्यानंतर याठिकाणी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी संजय बच्छाव यांनी पाहणी केली. यावेळी नगरसेवक अ‍ॅड. अरविंद शेळके व नागरिक उपस्थित होते. मनपाने येथील पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करण्याची मागणीही यावेळी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)