शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

देवगाव फाट्यावरील विहिरीत तरुण-तरुणीचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 01:16 IST

देवगाव : येथील फाट्यानजीकच्या विहिरीत एक तरुण व तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देविहिरीत आढळून आलेल्या तरुणाची ओळख पटली

देवगाव : येथील फाट्यानजीकच्या विहिरीत एक तरुण व तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सोमवारी (दि.२९) सायंकाळी ही घटना उघडकीस आली. मृत तरुण हा मालेगाव तालुक्यातील येसगाव येथील असून, तरुणी निफाडमधील असल्याचे समजते. सदर प्रकार आत्महत्या की घातपात याचा पोलीस शोध घेत आहेत.भरवसफाटा, कोळपेवाडी राज्य महामार्ग क्र. ७ वरील देवगाव फाट्यानजीक भाऊसाहेब भीमराव शिंदे यांच्या गट नं. १८६ मधील विहिरीत सोमवारी (दि.२९) सायंकाळी सहा ते सव्वासहा वाजेच्या सुमारास काळा टॉप, पिवळी लेगिन्स, उजव्या हातात घड्याळ, डाव्या हातात कडे, पायात बाजारातील तोरड्या, गळ्यात बाजारू मंगळसूत्र अशा पेहरावातील २२ ते २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर दीड तासाच्या अंतराने सायंकाळी ७.५० वाजेच्या दरम्यान आणखी एका तरुणाचा मृतदेह फुगून वर आला. याबाबत लासलगाव पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल डी.के. ठोंबरे, डी. डी. पानसरे, हवालदार कोते, किशोर वाणी, मत्सागर आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी निफाड ग्रामीण रुग्णालयात पाठविला. सदर तरुण व तरुणीने आत्महत्या केली की त्यांची कोणी हत्या केली हे अद्याप गुलदस्त्यात असून, पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत.तरुणाची ओळख पटलीसदर विहिरीत आढळून आलेल्या तरुणाची ओळख पटली असून, तो मालेगाव तालुक्यातील येसगाव येथील रहिवाशी आहे. सागर वेताळ असे त्याचे नाव असून, तरुणी निफाड येथील रहिवाशी असल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी दिवसभर विहिरीजवळ सदर तरुणाची मोटारसायकल उभी होती, मात्र नंतर ती त्याचे नातलग घेऊन गेल्याचे समजते.

टॅग्स :Deathमृत्यूPolice Stationपोलीस ठाणे