शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर शहरात दिवसाआड पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 22:45 IST

त्र्यंबकेश्वर : शहरात यांत्रिक बिघाडामुळे अंबोली लघुपाट धरण ओव्हरफ्लो झाले असतांना शहरात तीन महिन्यांपासुन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर बेझे येथील गौतमी प्रकल्प जवळपास ४५ टक्के भरले असतांना त्र्यंबकेश्वर शहरातील श्री निरंजनी अखाडा परिसरातील आनंद आखाडा, कैलासराजा नगर, तलाठी कॉलनी, श्रीस्वामी समर्थ केंद्र ,गुळवेवाडी, पेगलवाडी या परिसरातील रहिवासीयांना गेल्या सात दिवसांपासुन पाणीच नसल्याने इतरत्र जलाशयातुन पाणी भरुन नेण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देतांत्रिक बिघाड : निरंजनी आखाडा परिसर सात दिवसांपासुन कोरडाच

त्र्यंबकेश्वर : शहरात यांत्रिक बिघाडामुळे अंबोली लघुपाट धरण ओव्हरफ्लो झाले असतांना शहरात तीन महिन्यांपासुन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर बेझे येथील गौतमी प्रकल्प जवळपास ४५ टक्के भरले असतांना त्र्यंबकेश्वर शहरातील श्री निरंजनी अखाडा परिसरातील आनंद आखाडा, कैलासराजा नगर, तलाठी कॉलनी, श्रीस्वामी समर्थ केंद्र ,गुळवेवाडी, पेगलवाडी या परिसरातील रहिवासीयांना गेल्या सात दिवसांपासुन पाणीच नसल्याने इतरत्र जलाशयातुन पाणी भरुन नेण्याची वेळ आली आहे.त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेत ह्यआंधळ दळतंय आणि कुत्र पीठ खातंयह्ण अशी परिस्थिती असतांना पाण्यासारख्या ज्वलंत प्रश्नावर नगरपरिषद गंभीर नाही. याचेच सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.वास्तविक अशा परिस्थितीत युध्द पातळीवर मोटार दुरुस्त करणे गरजेचे असतांना कासवगतीने व बेफिकीरीने मोटार दुरुस्तीला टाकण्यात आली ती आता दुरुस्त होवून झाली की नाही याबाबत कोणताच पाठपुरावा केलेला नाही.अखेर सोमवारी (दि.२६) सायंकाळी मोटार दुरुस्त करुन आणल्याचे समजले. तो पर्यंत ज्या रहिवासीयांना सात आठ दिवस पाणीच न आल्याने ते लोक विहीरी, झरे याचा वापर करीत असल्याचे पहावयास मिळाले.पावसाळी वातावरण त्यात अशुद्ध पाणी पिल्याने काहींना सर्दी, खोकला, जुलाब असा त्रास होत आहे. त्यामुळे अनेकांच्या डॉक्टरांकडे फऱ्या वाढल्या आहेत.वास्तविक नगरपरिषदेत अहिल्या धरण, अंबोली धरण, बेझे येथील गौतमी प्रकल्पातून नगरपरिषद पाणी उचलत असतांना त्र्यंबक पालिकेला आपल्या पदरी एखादी दोन मोटार जादा ठेवणे गरजेचे आहे. भविष्यात असा हलगर्जी पणाबद्दल नागरीकांनी तीव्र नाराजी बोलून दाखविली.

टॅग्स :water shortageपाणीकपातtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर