शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

माघारीच्या दिवशीच उडाला  ग्रामपंचायत विजयाचा गुलाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 01:12 IST

जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अर्ज माघारीच्या दिवशी अनेक प्रभागांमध्ये उमेदवारांनी माघार घेतल्याने काही जागा बिनविरोध निवडून आल्या. राजकीय घडामोडीमुळे  रंगलेल्या माघारी नाट्यानंतर  जागा बिनविरोध   येताच उत्साही कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण केली जात होती. उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी तहसील कार्यालयांमध्ये सर्वत्र अशीच परिस्थिती दिसून आली. 

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक : अनेक प्रभागांंतील जागा बिनविरोध 

नाशिक : जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अर्ज माघारीच्या दिवशी अनेक प्रभागांमध्ये उमेदवारांनी माघार घेतल्याने काही जागा बिनविरोध निवडून आल्या. राजकीय घडामोडीमुळे  रंगलेल्या माघारी नाट्यानंतर  जागा बिनविरोध   येताच उत्साही कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण केली जात होती. उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी तहसील कार्यालयांमध्ये सर्वत्र अशीच परिस्थिती दिसून आली. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सोमवारी दुपारपर्यंत अर्ज माघारीसाठी अनेक राजकीय घडामोडी घडल्या. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अगोदरपासूनच प्रयत्न होत असताना उर्वरित प्रभागांमध्येदेखील बिनविरोध करण्याचे काटेकोर प्रयत्न करण्यात आले. त्यानुसार कालपासूनच प्रयत्न सुरू झाले होते. सोमवारी अर्ज माघारीच्या दिवशी काही प्रभागांमध्ये जागा बिनविरोध करण्यालादेखील यश आले. ज्या ग्रामपंचायतीमध्ये केवळ सात आणि नऊ तसेच ११ सदस्य संख्या आहे, अशा ठिकाणी काही उमेदवारांना माघार घेण्यास भाग पाडण्यात आल्याने काही जागा बिनविराेध होऊ शकल्या. उर्वरित पाच ते तीन जागांसाठी अशा ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक रंगणार आहे.  कमी सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न झाले, त्यानुसार काही ठिकाणी यशदेखील आले. मात्र, काही ग्रामपंचायतींमध्ये अवघ्या दोन ते तीन जागांसाठी निवडणूक रंगणार आहे. जिल्ह्यात सात सदस्यसंख्या असलेल्या १५३, नऊ सदस्यसंख्या असलेल्या २९१, अकरा सदस्यसंख्येच्या १०८, १३ सदस्य असलेल्या ३२ आणि १५ सदस्यसंख्येच्या १४ तर १७ सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या २३ इतकी आहे. ५८९५ इतक्या सदस्यांसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघारीनंतर  निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट झाले आहे. चिन्हांचे वाटपनिवडणुकीसाठी सोमवारी   अर्ज माघारी झाल्यानंतर सायंकाळपर्यंत रिंगणातील उमेदवारांना चिन्हे वाटप करण्यात आले. दुपारी तीन वाजतापर्यंत अर्ज माघारीची मुदत होती. त्यानंतर चिन्हे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झाली.गाड्यांची लागली रांगदुपारी ३ वाजेपर्यंतच अर्ज माघारीची मुदत होती. त्यासाठी तालुक्यांमध्ये तसेच गावपातळीवर अनेक घडामोडी घडल्या. अर्ज माघारीनंतर तहसील कार्यालय आवारातच गुलाल  उधळत मिरवणूक काढली. बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली, तरी एकमेव अर्ज राहिल्याने कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जात होता. दरम्यान, तहसील कार्यालय आवारात सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, तर पार्किंग केलेल्या गाड्यांचीदेखील रांग लागलेली होती. 

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत