सायखेडा : वातावरणातील गारवा कमी होताच उन्हाचा तडाखा सुरु झाला असून मार्च महिन्याच्या मध्यवर्ती उन्हाचा जोर वाढला आहे गेल्या काही दिवसांपासून सायखेडा परिसरातिल तापमानात वाढ झाली आहे पारा ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचला आहे त्यामुळे वातावरणात मोठा उष्मा वाढला आहे. दर वर्षी उन्हाची दाहकता वाढत असते यंदा मात्र दरवर्षीच्या तुलनेत सूर्य जास्तच तापत असल्याने मार्च महिना संपण्याअगोदरच अंगाची लाही लाही होऊ लागली आहे,वाढत्या उन्हामूळे बाजारपेठ, शेतीतील कामे, नागरिकांचे फिरणे या दैनंदिन कामावर परिणाम झाला आहे, वाढत्या उन्हापासून संरक्षण करण्यासाठी वापरल्या जाणारे टोपी,रु माल, सनकोट,यांची खरेदी वाढली आहे असून नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे। तर शीतपेयाची दुकाने गजबजू लागली आहे, थंड पाणी आणि उसाचा रस, कोल्ड्रींग्स, आईस्क्रीम यांची मागणी वाढली आहे, चांदोरी सायखेडा व सायखेडा चौफुली, मेनरोड रस्त्यावर रसवन्ती गृह भर दुपारी गजबजु लागली आहे, रसवन्ती गृहाच्या ठिकाणी बांधलेल्या घुंगरांचा मंजुळ आवाज परिसरात वातावरण निर्मिती करत आहे आणि हा मंजुळ आवाज अनेक वाटसरूंना उसाच्या रसाची आठवण करून देत आहे, एकंदरीतच वाढत्या उन्हाने माणसाच्या दैनंदिन जीवनात वर परिणाम झाला असून वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करून उन्हापासून बचाव करण्यासाठी परिसरात प्रयत्न सूरु झाल्याचे चित्र दिसत आहे. (वार्ताहर)
उन्हाच्या दाहकतेने दैनंदिन व्यवहार विस्कळीत
By admin | Updated: March 23, 2017 21:49 IST