शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वेस्ट इंडिजच्या ड्वेन ब्राव्होला आवडते नाशिकची मिसळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 01:06 IST

नाशिक : पुणेरी मिसळ, कोल्हापुरी मिसळ आणि ठिकठिकाणच्या मिसळ परंपरांनी आपापले स्थान निर्माण केले असले तरी नाशिकच्या झणझणीत पण तितक्याच चटकदार मिसळीचा तोरा काही औरच असतो.

ठळक मुद्देक्रिकेटपटूला नाशिकच्या मिसळची भुरळ पडलीनाशिकची मिसळ-पावदेखील खूप खूप आवडतं

नाशिक : पुणेरी मिसळ, कोल्हापुरी मिसळ आणि ठिकठिकाणच्या मिसळ परंपरांनी आपापले स्थान निर्माण केले असले तरी नाशिकच्या झणझणीत पण तितक्याच चटकदार मिसळीचा तोरा काही औरच असतो. नाशिकला येणाऱ्या कोणत्याही पर्यटकाची वा प्रवाशाची नाश्त्यासाठी पहिली पसंती मिसळीलाच असते. आता तर नाशिकच्या मिसळीचा डंका सातासमुद्रापार वाजत असून, चक्क एका विदेशी क्रिकेटपटूला नाशिकच्या मिसळची भुरळ पडली आहे. होय, वेस्ट इंडिजचा अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्हो याने चक्क मराठीत बोलत नाशिकच्या मिसळीचे कौतुक केले. ‘मला नाशिक खूप खूप आवडतं आणि नाशिकची मिसळ-पावदेखील खूप खूप आवडतं. आणि माझ्या नाशिकचे लोक खूप खूप छान आहेत,’ असे तो चक्क मराठीत बोलताना दिसत आहे. ब्राव्होचे या शब्दांनी कोण्याही नाशिककराचा ऊर अभिमानाने भरून आल्याशिवाय राहणार नाही. सध्या ब्राव्हो आयपीएलनिमित्त भारतात आला असून, यंदाच्या सीजनमध्ये तो चेन्नई सुपरकिंगकडून खेळताना दिसणार आहे. दरम्यान, नाशिकचे नृत्य दिग्दर्शक सचिन खैरनार यांनी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ब्राव्होची भेट घेतली. यावेळी ब्राव्होसोबत बोलतानाचा त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्येच ब्राव्हो नाशिकची मिसळ आवडत असल्याचे सांगत आहे. सचिन खैरनार ब्राव्होला नाशिकची मिसळ मला खूप खूप आवडते असे मराठीत बोलण्यास सांगतात, तोदेखील त्यांच्या मागे मराठीत बोलत नाशिकचे कौतुक करतो. खरं तर ब्राव्होला त्याच्या मस्तमौला अंदाजासाठी ओळखले जाते. किक्रेटच्या मैदानावरच नव्हे तर डान्सच्या व्यासपीठावरही त्याने आपला जलवा दाखवून दिला आहे. एका वाहिनीच्या नृत्य कार्यक्रमादरम्यान, याचनिमित्ताने त्याची नाशिकचे नृत्य दिग्दर्शक सचिन खैरनार यांच्याशी ओळख झाली होती. सहायक नृत्य दिग्दर्शक म्हणून सचिनने ब्राव्होला विविध गाण्यांवर नृत्याचे धडे दिले.