शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सासूला वाचवण्याच्या प्रयत्नात सुनेचाही बुडून मृत्यू; मनमाडमधील घटनेनं परिसरात हळहळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 12:22 IST

दोन महिलांवर काळाने झडप घातल्यानं गावावर शोककळा

मनमाड (नाशिक) : येथील पांडुरंग नगर भागात शेतातील विहिरीवर पाणी काढताना पाय घसरून पडलेल्या सासूला वाचवण्याच्या प्रयत्नात सुनेचाही विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. एकाच घरातील दोन महिलांवर काळाने झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.शहराच्या पश्चिम भागातील पांडुरंग नगर परिसरात राहणाऱ्या गयाबाई पवार आणि मनीषा पवार या सासू-सूना शेजारच्या मळ्यात असलेल्या विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या. या विहिरीला कठडा नाही. पाणी काढत असताना अचानक सासू गयाबाईचा तोल जाऊन त्या विहिरीत पडल्या.सासू विहिरीत पडल्याचे पाहून सून मनीषाने आरडाओरडा केला. मात्र परिसरात कोणीही नसल्यामुळे मदत मिळू शकली नाही. त्यामुळे मनीषाने साडीचा पदर विहिरीत सोडून सासूला वाचवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र प्रयत्न करत असताना तीदेखील विहिरीत पडली. दोघींना पोहता येत नसल्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.मयत मनीषा हिला एक आठ वर्षाचा मुलगा व सहा व चार वर्षांच्या दोन मुली आहे.तिच्या निधनाने तीन बालकांचे मातृछत्र हरवले आहे.या बाबद पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.