नाशिक : अर्जुन पुरस्कारप्राप्त दत्तू भोकनळचा जिल्हा क्र ीडा अधिकारी कार्यालय आणि विविध क्र ीडा संघटनांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी नाशिक विभागाचे क्र ीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे, जिल्हा क्र ीडा अधिकारी रवींद्र नाईक, छत्रपती पुरस्कारप्राप्त साहेबराव पाटील, आनंद खरे, अविनाश खैरनार, श्रद्धा नाल्लमवार, क्र ीड संघटक मंदार देशमुख, महेश दाबक, हेमंत पाटील, क्र ीडा अधिकारी प्रकाश पवार, दिलीप खिल्लारे, महेश पाटील, अरविंद चौधरी, संदीप ढाकणे, सलीम सय्यद, भास्कर कुटे आदी मान्यवर उपस्थित होते.रवींद्र नाईक यांनी मेहनत केली तर एका छोट्याशा गावातून खेळाडू थेट आॅलिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकतो, असे आपल्या स्वत:च्या उदाहरणातून दाखवून दिले आहे. त्यामुळे दत्तूच्या या उच्च कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे.सत्काराला उत्तर देताना दत्तू भोकनळ म्हणाला, मी आणखी जोमाने मेहनत करून आॅलिम्पिकमध्ये मेडल मिळविण्याचा प्रयत्न करेन. सत्काराबद्दल त्याने सर्वांचे आभार मानले.नाशिक विभागाचे क्र ीडा उपआयुक्त चंद्रकांत कांबळे यांनी सांगितले, दत्तू भोकनळ याने क्र ीडा क्षेत्रात मोठी मजल मारली आहे. यापुढेही त्याला आणि चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शासनाच्या वतीने जास्तीत जास्त सहकार्य केले जाईल.
दत्तू भोकनळचा संघटनांतर्फे सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 01:15 IST