शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

नाशिकरोडला विविध ठिकाणी दत्त जयंती महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 00:40 IST

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात नाशिकरोड परिसरातील मंदिरांमध्ये व ठिकठिकाणी श्री दत्त महाराज यांची जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांद्वारे भक्तीभावाने साजरी करण्यात आली.

नाशिकरोड : दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात नाशिकरोड परिसरातील मंदिरांमध्ये व ठिकठिकाणी श्री दत्त महाराज यांची जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांद्वारे भक्तीभावाने साजरी करण्यात आली. मंदिरांमध्ये दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.  श्री दत्त महाराज यांच्या जयंतीनिमित्त दत्तमंदिररोड येथील घैसास दत्तमंदिर, श्री स्वामी समर्थ मंदिर, देवळालीगाव आठवडे बाजारातील श्री दत्त महाराज मंदिर, मुक्तिधाम, लक्ष्मीनारायण मंदिर, पोलीस ठाण्यातील श्री हनुमान- दत्त महाराज मंदिर, बिटको महाविद्यालयामागील श्री एकमुखी दत्तमंदिर, विहितगाव श्री अण्णा गणपती नवग्रह सीद्धपीठम, शास्त्रीपथ श्री दत्तमंदिर, माडसांगवी येथील श्रीपाद श्रीवल्लभ मंदिर, शिलापूर येथील श्री दत्त महाराज मंदिर आदी मंदिरांत श्री दत्त महाराज यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन, प्रवचन झाले. देवळालीगाव आठवडे बाजारातील श्री दत्त महाराज मंदिरात गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता दुपारी हभप बाळनाथ सद्गीर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. सायंकाळी परिसरातून श्री दत्त महाराज पालखी मिरवणूक काढून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. परिसरातील मंदिरांमध्ये सायंकाळी ६ वाजता श्री दत्त महाराज जन्मोत्सव धार्मिक पद्धतीने साजरा करण्यात आला. सर्व श्री दत्त महाराज मंदिरात विद्युत रोषणाई करून श्री दत्त महाराजांचे भजन, गाणे स्पिकरवरून लावण्यात आले होते. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.सर्व श्री स्वामी समर्थ केंद्रांत श्री दत्त जयंतीनिमित्त गेल्या आठवडाभरापासून गुरूचरित्र पारायण वाचन, याग, होम-हवन सुरू आहे. श्री दत्त जयंतीनिमित्त शनिवारी गुरूचरित्रातील चौथा अध्याय वाचून दुपारी १२.३९ वाजता श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. मुक्तिधाम, कोठारी कन्या शाळेसमोर शिवम कॉम्प्लेक्स दत्तमंदिर सिग्नल जवळ, दुर्गा उद्यान भाजीबाजार आदी ठिकाणी श्री औदुंबराच्या झाडाखाली असलेल्या छोट्या मंदिरात परिसरातील व्यापारी, रहिवासी, भाविक यांनी मोठ्या उत्साहात श्री दत्त महाराज जयंती साजरी केली.दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जयघोषइंदिरानगर : दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात आणि विविध धार्मिक कार्यक्र मांनी परिसरांतील दत्त मंदिरांत श्री दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दत्त मंदिर परिसरात फुले व फळांची दुकाने थाटली होती. तसेच सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. जिल्हा परिषद कॉलनीतील श्री गुरु देव दत्त मंदिर सेवा संस्थेच्या वतीने दत्त मंदिरात सकाळी ती दत्त पूजन अभिषेक पादुका पूजन आणि नवीन वस्त्र परिधान करण्यात आले. तसेच सकाळी साडेदहा वाजता जन्मोत्सवानिमित्त हभप कल्पेश महाराज यांचे कीर्तन झाले. भरत महाराज व भजनी मंडळाचा कार्यक्र म संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष भानुदास शौचे, बापू गोरे, रमाकांत अलई, गोपाळ गर्गे यांसह सदस्यांनी परिश्रम घेतले. परबनगर येथील दत्तकृपा सेवा समितीच्या वतीने दत्त मंदिरात सकाळी आठ वाजता ‘श्रीं’ची महापूजा शशिकांत कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आली. श्री दत्त चैतन्य भजन सेवेचे वतीने भजनाचा कार्यक्र म,दत्तजन्म, पाळणा, आरती व त्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच राजीव टाउनशिप येथील श्री दत्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्र म संपन्न झाले. परिसरातील मंदिरांत नगरसेवक सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी, श्याम बडोदे, सुप्रिया खोडे यांनी पूजन केले. परिसरातील नागरिकांनी दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घेतला. द्वारका येथील श्री संत गाडगे महाराज युवक मित्रमंडळाच्या वतीने दत्त मंदिरात सकाळी ‘श्रीं’ची महापूजा करण्यात आली. दत्तयाग, जन्मोत्सव यांसह विविध धार्मिक कार्यक्र म संपन्न झाले. तसेच सायंकाळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्र माठी मंगेश आहेर, कैलास देशमुख, अक्षय ताजणे, उपेंद्र पाटील, शुभम जाधव, तेजस विधाते आदी उपस्थित होेते.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमDatta Mandirदत्त मंदिरNashikनाशिक