पेठ : शहर व परिसरात दसरा सण उत्साहात साजरा करण्यात आला़पेठचे ग्रामदैवत रानदेवी मंदिराला विद्युत रोषणाई व फुलांच्या माळांनी सजवण्यात आले होते़ भाविकांनी सायंकाळी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती़ विद्यार्थ्यांनी वह्यापुस्तकांची व शैक्षणिक साहित्याची पूजा केली.दसऱ्याच्या दिवशी येथील शनिमंदिर, रानदेवी, गावदेवी आदि देवतांना सोने चढवून सोने वाटप केले जात नसल्याची परंपरा आहे़ रात्री उशिरापर्यंत एकमेकांना सोने देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या जात होत्या़ सर्वधर्मीय समाजातील नागरिकांनी यात सहभाग घेतला़ (वार्ताहर)
पेठ तालुक्यात दसरा उत्साहात
By admin | Updated: October 13, 2016 23:41 IST