शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दसरा-दिवाळीसाठी झेंडूची शेती बहरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 16:12 IST

नाशिक : दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड ते दोन महिन्यांपूर्वी लागवड केलेली झेंडूची शेती बहरली असून, पिवळ्या व केशरी रंगाच्या ...

ठळक मुद्देचांगला भाव : शेतकरी आनंदात एक क्रेट फुले सुमारे २०० ते २५० रुपयांप्रमाणे विकली जातात

नाशिक : दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड ते दोन महिन्यांपूर्वी लागवड केलेली झेंडूची शेती बहरली असून, पिवळ्या व केशरी रंगाच्या झेंडूची फुले डौलाने उभी असल्याने परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे.एकलहरे परिसरातील गंगावाडी, सामनगाव, कोटमगाव या ठिकाणी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात झेंडूची लागवड केली असून, त्यातही शेतक-यांनी ३०७ यलो व मरिन आॅरेंज या जातीच्या झेंडूच्या लागवडीला पसंती दिली आहे. झेंडूचे उत्पादन दीड ते दोन महिन्यात येते. आॅगस्टच्या मध्यावर व सप्टेंबरमध्ये लागवड केलेले झेंडू बरोबर सणासुदीत म्हणजेच दसरा, दिवाळीत बहरून खुडायला येतो. बहुतांशी शेतक-यांनी झेंडूसाठी ड्रिपच्या पाण्याची व्यवस्था केली असून, मशागत, रोपे लागवड, औषध फवारणी, ड्रिप, खुडणी, वाहतूक असा सुमारे लाख रुपये एकरी खर्च येतो. झेंडूचा खुडा दसरा, दिवाळीच्या सुमारास केला जातो. त्यावेळी झेंडूची मागणी वाढलेली असल्याने एका क्रेटमध्ये तीन किलो झेंडू सामावतात. एक क्रेट फुले सुमारे २०० ते २५० रुपयांप्रमाणे विकली जातात. काही ठिकाणी थेट व्यापारीच शेतावर जाऊन ५० रुपये किलोप्रमाणे खरेदी करीत असून, किरकोळ विक्रीसाठी झेंडूची नाशिकरोड, बिटको पॉइंट, शिवाजी पुतळा तसेच नाशिक शहरातील अन्य भागात विक्री केली जाते. तर व्यापारी खरेदी करीत असलेला झेंडू कल्याण व सुरत येथे पाठविला जातो.सध्या सण-उत्सवाचे दिवस असल्याने झेंडूला चांगली मागणी असल्यामुळे एकरी खर्च वजा जाता ५० ते ७५ हजारापर्यंत फायदा होत असल्याचे शेतकºयांनी सांगितले. मात्र हा पैसा टप्प्याटप्प्याने येत असल्याने लगेचच दुसºया पिकासाठी खर्च होत असल्याने त्याचा फायदा लक्षात येत नसल्याचे शेतकरी सांगतात.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक