शहरं
Join us  
Trending Stories
1
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
2
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
3
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
4
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
5
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
6
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
7
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
8
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
9
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
10
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
11
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
12
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
13
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
14
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
15
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
16
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
17
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
18
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
19
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
20
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!

श्रावणात पहिल्यांदाच कपालेश्वरचे दर्शन बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 00:28 IST

पंचवटी : कोरोना पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून प्रशासनाने गेल्या चार महिन्यांपासून सर्वच मठ, मंदिरे बंद केले आहे. त्यामुळे शेकडो भाविकांना देवदेवतांच्या दर्शनापासून वंचित राहावे लागत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून श्रावण मास सुरू झाल्याने भाविकांना कपालेश्वर मंदिरात दर्शनासाठी नियमावली ठरवून व फिजिकल डिस्टन्सिंग अटीवर परवानगी देण्यात यावी, अशी मागणी शिवभक्तांनी केली आहे.

पंचवटी : कोरोना पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून प्रशासनाने गेल्या चार महिन्यांपासून सर्वच मठ, मंदिरे बंद केले आहे. त्यामुळे शेकडो भाविकांना देवदेवतांच्या दर्शनापासून वंचित राहावे लागत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून श्रावण मास सुरू झाल्याने भाविकांना कपालेश्वर मंदिरात दर्शनासाठी नियमावली ठरवून व फिजिकल डिस्टन्सिंग अटीवर परवानगी देण्यात यावी, अशी मागणी शिवभक्तांनी केली आहे.श्रावण महिना सुरू होत असल्याने विविध देवदेवतांची मंदिरे भाविकांना देवदर्शनासाठी खुली करावी, अशी मागणी काही दिवसांपूर्वी साधू-महंतांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली होती. श्रावण महिन्यात भाविक विविध पूजा, विधी, अभिषेक पूजन करत असल्याने दरवर्षी भाविकांची महादेव मंदिरात गर्दी होत असते. मात्र यंदा कोरोना सावट असल्याने प्रशासनाने खबरदारी म्हणून सर्वच मठ, मंदिरे बंद ठेवण्याबाबत मंदिर प्रशासनाला सूचना दिल्या आहेत त्या नुसार सर्व मठ, मंदिर बंद आहे. त्यामुळे भाविकांना लांबूनच देवदर्शन घ्यावे लागत आहे.--------------------प्रदक्षिणा : मोजक्याच गुरवांची उपस्थितीकपालेश्वर महादेव मंदिराच्या वतीने दर सोमवारी व प्रदोषच्या दिवशी महादेवाची पालखी मिरवणूक काढली जाते. मात्र कोरोना पार्श्वभूमीवर कपालेश्वर पालखी मिरवणूक परिसरातून मिरविणे बंद आहे. मंदिरातील मोजक्या गुरवांच्या उपस्थितीत कपालेश्वर मंदिराला पालखीसह तीन प्रदक्षिणा मारल्या जाऊन पालखी मिरवणूक आटोपती घेतली जात आहे. सध्या श्रावण महिना असल्याने व त्यातच श्रावणात कपालेश्वर पालखीसाठी भाविक मोठ्या संख्येने हजेरी लागण्याची शक्यता असल्याने पालखी मिरवणूक काढण्याबाबत स्पष्टोक्ती नाही.----------------श्रावण महिन्यात भाविक उपासना करत असल्याने प्रशासनाने मंदिराचे विश्वस्त मंडळ, पुजारी यांना सूचना देत फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्या पाठोपाठ भाविकांची गर्दी होणार नाही तसेच मंदिर परिसरात सॅनिटायझर ठेवत नियमांचे पालन करावे या अटीवर परवानगी देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक