शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

अलंग किल्ल्यावर धाडसी खेळाचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 17:28 IST

घोटी : गिर्यारोहण हा असा एक खेळ आहे, जिथे शारीरिक शक्ती बरोबर मानसिक क्षमताही पणाला लागते. या दोन्हीही क्षमतेमध्ये वाढ करायला शिकता येते. आजच्या धकाधकीच्या जीवनात,स्पर्धेच्या युगात तरुण पिढी तणावात येऊन व्यसनाधीन होऊन नैराश्यात जात आहे.

घोटी : गिर्यारोहण हा असा एक खेळ आहे, जिथे शारीरिक शक्ती बरोबर मानसिक क्षमताही पणाला लागते. या दोन्हीही क्षमतेमध्ये वाढ करायला शिकता येते. आजच्या धकाधकीच्या जीवनात,स्पर्धेच्या युगात तरुण पिढी तणावात येऊन व्यसनाधीन होऊन नैराश्यात जात आहे. त्यामुळे अशा तरुणांना निसर्गाच्या सानिध्यात जाऊन स्वतःची शारीरिक व मानसिक स्थिती मजबूत करण्याचा मार्ग म्हणजे गिर्यारोहणाचा पर्याय होय. घोटीच्या कळसूबाई मित्र मंडळाच्या माध्यमातून राज्यातील अत्यंत खडतर व अवघड किल्ला असलेल्या व कळसूबाई शिखराच्या रांगेत असलेल्या अलंग किल्ल्यावर गिर्यारोहण संदर्भात युवकांना धाडसी खेळाचे प्रशिक्षण देण्यात आले.

कळसूबाई मित्र मंडळाचे गिर्यारोहक बाळू आरोटे, विठ्ठल केकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय कठीण असलेल्या अलंग किल्ल्यावर गिर्यारोहणाचे प्रशिक्षण देण्यात आले. लहानपणापासून शिस्तबद्ध गिर्यारोहणाची माहिती हवी त्यामुळे बालगोपाळांना यामध्ये सहभागी करण्यात आले.

या उपक्रमात कळसूबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, बाळू आरोटे, विठ्ठल केकरे, प्रवीण भटाटे, अशोक हेमके, डॉ.महेंद्र आडोळे, निलेश पवार,पुरुषोत्तम बोराडे,सोमनाथ भगत, जैनम गांधी, मयूर मराडे, काळू भोर,प्रणिल चव्हाण, ओमकार रिके,अर्जुन पंडित,मनीषा मराडे, नगमा खलिफा, कृष्णा बोराडे, पुष्कर पवार आदी गिर्यारोहक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते.गिर्यारोहकांचे वाढविले मनोबलअवघड किल्ले,उंच शिखर,डोंगर दऱ्या कसे चढणे,उतरणे ,तसेच निसर्गाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेणे ,तसेच प्रस्तरारोहणाचे प्रात्याक्षिक करून घेण्यात आले. अशी विविध प्रकारची माहिती देऊन ह्या मोहिमेत गिर्यारोहकांचे मनोबल वाढविण्याचे कार्य कळसूबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकानी केले. 

टॅग्स :FortगडStudentविद्यार्थी