शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

घाटातील धोकादायक वळण रस्त्याला टिपड्यांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 19:40 IST

आंबेनळी घाटात झालेल्या दुर्घटनेत ३३ जणांचा बळी गेल्यानंतर महाराष्ट्रभर प्रशासन सतर्कझाले. नाशिक-गुजरात राष्ट्रीय महामार्गावरील सावळघाटातील धोकादायक वळणाचे संबंधित यंत्रणेला कोणतेही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.

पेठ : आंबेनळी घाटात झालेल्या दुर्घटनेत ३३ जणांचा बळी गेल्यानंतर महाराष्ट्रभर प्रशासन सतर्कझाले. नाशिक-गुजरात राष्ट्रीय महामार्गावरील सावळघाटातील धोकादायक वळणाचे संबंधित यंत्रणेला कोणतेही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. या धोकादायक वळणावर चक्क लोखंडी टिपड्यांना प्लॅस्टिकच्या पट्ट्या बांधून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आल्याने अशा प्रकारची उपाययोजना अपघात कसे रोखू शकेल? असा प्रश्न निर्माण झाला आहे.  नाशिकपासून पेठकडे जाताना दिंडोरी व पेठ तालुक्याच्या सीमारेषेवर सावळघाट आहे. एका बाजूला उंच डोंगर तर दुसऱ्या बाजूला खोल दरी असल्याने या घाटातून प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. घाटाच्या संरक्षक भिंती ढासळल्या आहेत. अनेक वळणांवर धोकादायक स्थिती निर्माण झाली असताना घाटाच्या मध्यभागी एका अवघड वळणावर दरीच्या दिशेने संरक्षक कठडाच नसल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित यंत्रणेने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी रस्त्याच्या कडेला लोखंडी टिपडे ठेवून त्याला दोरी बांधून तात्पुरती मलमपट्टी करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.दिशादर्शक फलक झाले गायबसावळघाट सुरू होतानाच तीव्र वळण असल्याने रात्रीच्या अंधारात व दाट धुक्यात हे वळण दिसत नसल्याने वाहने सरळ जाऊन आदळतात. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा दिशादर्शक फलक नसल्याने वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मध्यंतरी घाटात लावलेल्या दिशादर्शक फलकांवर चक्क गणपतीच्या रेडियम प्रतिमा चिटकविण्याची किमया प्रशासनाकडून करण्यात आली होती. यावर भाविकांनी आक्षेप नोंदविल्याने ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन अशा प्रतिमा काढून टाकण्यात आल्या असल्या तरी त्यानंतर त्यावर रेडियम लावले नसल्याने अपघाताला आमंत्रण देण्याची वेळ आली आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक