शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

गोविंदनगर भागात धोकादायक झाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 01:04 IST

गोविंदनगर येथील अनमोल प्राइड अपार्टमेंटलगत असलेले झाड धोकादायक झाले असून, याबाबत परिसरातील नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार करूनही दखल घेतली नसल्याने रहिवाशांना जीव मुठीत घेऊन येथून ये-जा करावी लागत आहे.

ठळक मुद्देतक्रारीकडे दुर्लक्ष : अपघाताची भीती; कारवाईची मागणी

सिडको : गोविंदनगर येथील अनमोल प्राइड अपार्टमेंटलगत असलेले झाड धोकादायक झाले असून, याबाबत परिसरातील नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार करूनही दखल घेतली नसल्याने रहिवाशांना जीव मुठीत घेऊन येथून ये-जा करावी लागत आहे.गोविंदनगर भागात असलेल्या अनमोल प्राइड अपार्टमेंटसमोरच गेल्या अनेक वर्षांपासूनचे जुने झाड आहे. या झाडाजवळून रस्ता जात असून, या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची तसेच नागरिकांची वर्दळ सुरू असते. यातच याच परिसरात असलेल्या शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाहनेदेखील येथून ये-जा करतात. धोकादायक झाड त्वरित हटविण्यात यावे याबाबत अनमोल प्राइड अपार्टमेंट व परिसरातील व्यावसायिक कैलास चुंभळे, राधेय मालपाणी, रमेश चौधरी, बाळासाहेब निकम, डी. पी. पानस, सुहास भावसार यांनी मनपाकडे तक्रार केली आहे.सदरचे झाड हे धोकादायक झाले असल्याने त्याचा विस्तार कमी करावा किंवा काढून टाकावे याबाबत परिसरातील नागरिकांनी व अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी मनपाकडे तक्रार केली आहे. परंतु मनपा याबाबत दखल घेतली नसल्याने भविष्यात दुर्घटना घडल्यास कोन जबाबदार राहील? असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :NashikनाशिकNatureनिसर्ग