शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-आग्रा महामार्गावरील बसथांबे धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 00:14 IST

मुंबई-आग्रा महामार्गावरील धात्रक फाटा, समर्थनगर, कोणार्क येथील शहर बसथांबा प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे. प्रवाशांचे केंद्र असलेले हे बसथांबे महामार्गाच्या विस्तारीकरणानंतर अडचणीचे ठरत असून, वाढत्या अपघातांमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागत आहे.

आडगाव : मुंबई-आग्रा महामार्गावरील धात्रक फाटा, समर्थनगर, कोणार्क येथील शहर बसथांबा प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे. प्रवाशांचे केंद्र असलेले हे बसथांबे महामार्गाच्या विस्तारीकरणानंतर अडचणीचे ठरत असून, वाढत्या अपघातांमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागत आहे.  सदरचे बसथांबे हे पूर्वी महामार्गावर होते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण नव्हती. महामार्गाच्या विस्तारीकरणानंतर या मार्गावर तीन दुभाजक टाकले आहेत. हे दुभाजक टाकताना दोन्ही सर्व्हीस रस्त्यांच्या बाजूने हनुमाननगरपासून जत्रा हॉटेलपर्यंत लोखंडी जाळ्या टाकल्या आहेत. शहर वाहतुकीच्या बसेस या सर्व्हीस रोडने धावत असल्या तरी एक बाजूने प्रवाशांना प्रवाशांना बस पकडण्यासाठी या जाळ्यांवरून उडी मारून बस पकडावी लागते. तसेच महिलांना जाळी ओलांडणे शक्य होत नाही. त्यामुळे तासनतास प्रतीक्षा करावी लागते. या थांब्यावर स्थानिक नागरिक, एच.ए.एल.चे कर्मचारी, महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी यांची सदैव वर्दळ असते. बस आल्यानंतर पकडण्यासाठी एकच झुंबड उडत असल्याने अनेक जण जाळ्यांवरून पडून जखमी होतात. तसेच सर्व्हिस रोडवरील वाहनांना या गर्दीमुळे अडथळा येऊन अपघातही होतात.  पालकांना यामुळे आपल्या शालेय पाल्यांना सोडण्यासाठी हनुमाननगर किवा जत्रा थांबा येथे जावे लागते. यामुळे अंतर तर वाढतेच, पण या दोन्ही थांब्यांवर वाहतुकीची गर्दी होते. दुभाजकांमुळे दुखापती होण्याची व मोठ्या अपघाताला आमंत्रण मिळण्याची शक्यता यामुळे बळावली आहे. त्यामुळे येथील बसथांबे अडचणीचे ठरत आहे.रिक्षाचालक घेतात फायदामहामार्गारील या बसथांब्यावर लोखंडी दुभाजक ओलांडणे वयोवृद्ध, महिलांना अडचणीचे ठरते. त्यामुळे त्यांना नाईलाजाने रिक्षाने जावे लागते किंवा काही किलोमीटर अंतरावरून दुसऱ्या बसस्थानकावर बस पकडण्यासाठी जावे लागते त्यामुळे या परिस्थितीचा रिक्षाचालकांकडून गैरफायदा जास्तीची भाडे आकारून लूट केली जाते.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा