शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

पडक्या घरांचा धोका कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 00:25 IST

पंचवटी : ‘नेमिची येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे पंचवटी मनपा दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी पंचवटीतील जुन्या पडके वाडे, धोकादायक दुमजली इमारतीत राहणाऱ्या घरमालक व भाडेकरूंना नियमानुसार लेखी नोटीस बजावून कागदोपत्री जबाबदारी पार पाडत असते. संबंधित घरमालक व भाडेकरू पडक्या वाड्यांची आणि घरांची कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करत नसल्याने धोकादायक वाडे इमारतींचा यंदाही पावसाळ्यात धोका कायम असल्याचे चित्र आहे.

पंचवटी : ‘नेमिची येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे पंचवटी मनपा दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी पंचवटीतील जुन्या पडके वाडे, धोकादायक दुमजली इमारतीत राहणाऱ्या घरमालक व भाडेकरूंना नियमानुसार लेखी नोटीस बजावून कागदोपत्री जबाबदारी पार पाडत असते. संबंधित घरमालक व भाडेकरू पडक्या वाड्यांची आणि घरांची कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करत नसल्याने धोकादायक वाडे इमारतींचा यंदाही पावसाळ्यात धोका कायम असल्याचे चित्र आहे.पंचवटी पालिका प्रशासनातर्फे यंदा दरवर्षीप्रमाणे पावसाळा सुरू होण्याअगोदर पडके वाडे, धोकेदायक इमारतीत राहणाºया सुमारे १८८ घरमालक व भाडेकरूंना नोटीस बजावण्यात आली आहे. नदीपात्रालगतच्या झोपडपट्टीत वास्तव्याला असलेल्या नागरिकांना, नदीकाठी व्यवसाय करणाºया व्यावसायिकांचाही त्यात समावेश आहे. पंचवटी गावठाण असल्याने परिसरात जुने वाडे जुन्या इमारती आहे. वर्षानुवर्षे भाडेकरू जुने असल्याने घरमालक आणि भाडेकरू यांच्यात घरे खाली करण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाले आहे. काही प्रकरणे न्यायालयात असून ती न्यायप्रविष्ठ आहे. पावसाळ्यात दरवर्षी जुन्या वाड्यांचा भाग कोसळण्याच्या घटना घडतात त्यामुळे भाडेकरू घरमालक वादात पडक्या वाड्यांची दैनीय अवस्था झाल्याचे दिसून येते.दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी पंचवटी मनपा घरमालक व भाडेकरूंना धोकादायक घरांचा वाड्यांचा जीर्ण भाग उतरवून घेण्यास किंवा दुरुस्ती करण्यासाठी लेखी नोटिसा बजावते. प्रत्यक्षात पावसाळा संपल्यानंतर सुद्धा पडक्या धोकेदायक वाडे इमारत व घरांची परिस्थिती ‘जैसे थे’ असते. थोडक्यात प्रशासन केवळ नोटीस बजावण्याचे काम करते; परंतु पडक्या वाड्यांची दुरुस्ती केली की नाही याबाबत कोणती खातरजमा किंवा पाहणी करून कारवाई करत नसल्याचे दिसून येते.-----पंचवटीतील राममंदिर परिसर, गंगाघाट, शनिचौक, मालवीय चौक आदी भागांत जुने वाडे व इमारती मोडकळीस आल्या आहे. दरवर्षी पावसाळ्यात इमारतींना धोका असतो. मनपा प्रशासनाने यंदाच्या वर्षीही पावसाळा सुरू होण्यापूर्वी नोटीस बजावण्याचे काम केले असले तरी संबंधित त्या पडक्या घरांची डागडुजी करणार की धोकादायक भाग उतरवून घेणार अथवा संबंधित महापालिकेच्या नोटिसीला केराची टोपली दाखविणार का हे आगामी पावसाळ्यात दिसून येईल.

टॅग्स :Nashikनाशिक