शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
3
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
4
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
5
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
6
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
7
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
9
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
10
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
11
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
12
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
13
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
14
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
15
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
16
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
17
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
18
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

‘दुबई’मध्ये रंगणार ‘दंगल’

By admin | Updated: February 10, 2017 00:36 IST

राष्ट्रवादीचे पॅनल : कॉँग्रेस, भाजपात फूट

 अझहर शेख नाशिकधनिकांचा प्रभाग म्हणून ‘दुबई’ असे म्हटल्या जाणाऱ्या प्रभागातील लढती येथील राजकारणाला कलाटणी देणाऱ्या ठरू शकतात. भाजपा, आणि कॉँग्रेस मधील फुट यामुळे येथील निकालही प्रतिष्ठेचा बनला आहे. प्रभाग १४मधून कॉँग्रेसच्या विद्यमान महिला नगरसेवकांनी हातावर ‘घड्याळ’ बांधल्याने कॉँग्रेसच्या एकमेव महिला उमेदवार रिंगणात आहे. राष्ट्रवादीचे पॅनल तयार झाले असले तरी शिवसेना व मनसेचे या प्रभागातील पॅनल शाबूत राहिल्याने त्यांचे राष्ट्रवादीला आव्हान राहणार आहे. महापालिकेच्या ३१ प्रभागांपैकी सर्वाधिक ४० उमेदवार या प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजपा, शिवसेना आणि कॉँग्रेस या तीन प्रमुख पक्षांमध्ये चुरस होणार आहे. दलित-मुस्लीम बहुल परिसर असल्यामुळे मनसे, समाजवादी, बसपा, अवामी विकास पार्टी, एआयएमआयएम या पक्षांकडूनही उमेदवार रिंगणात उतरविण्यात आले आहे. वीस उमेदवार अपक्ष म्हणून लढत देणार आहेत.प्रभाग १४ मध्ये कॉँग्रेस-राष्ट्रवादी या मित्र पक्षाच्या आघाडीनुसार प्रत्येकी दोन जागा वाटप करण्यात आल्या होत्या. राष्ट्रवादीकडून अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून शोभा साबळे, सर्वसाधारण गटातून सुफीयान जीन यांना उमेदवारी देण्यात आली होती; मात्र कॉँग्रेसकडून इच्छुक असलेले नसीरखान पठाण यांनीही राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल करत मनगटावर घड्याळ बांधणे पसंत केले. तसेच कॉँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका समीना मेमन यांना कॉँग्रेस पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली असतानाही त्यांनी राष्ट्रवादीच्या एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज भरला. या प्रभागात राष्ट्रवादीचे चार उमेदवारांचे पॅनल तयार झाले आणि कॉँग्रेसच्या १४ क सर्वसाधारण गटातून शहानूर शेख या एकमेव महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. या गटात शेख यांना मित्रपक्ष राष्ट्रवादीचे पठाण यांचे आव्हान असणार असून मैत्रिपूर्ण लढत या गटात पहावयास मिळणार आहे. उर्वरित तीन जागांवर मात्र कॉँग्रेसकडे उमेदवार नसल्याने राष्ट्रवादीला सेनेचे आव्हान असणार आहे. सेना-भाजपाचे कडवे आव्हान४प्रभाग १४मध्ये शिवसेना पक्षानेदेखील चार उमेदवार दिले आहेत. यामध्ये पक्षाने अनुसूचित जाती व नागरिकांचा मागास प्रवर्गातून दोन महिला आणि सर्वसाधारण गटातून दोन मुस्लीम पुरुष उमेदवार दिले आहेत. यामुळे जरी आघाडीचा हा प्रभाग बालेकिल्ला राहिला असला तरी या पंचवार्षिकमध्ये सेना-भाजपाचे राष्ट्रवादीला कडवे आव्हान राहणार आहे. शिवसेनेकडून मुजाहिद शेख, सायली काळे, रुपाली डहाके आणि मैनुद्दीन शेख हे रिंगणात, तर भाजपाचे तीनपैकी दोन मुस्लीम आहेत.