शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

 ‘नृत्यानुष्ठान’ : 'कथ्थक' नृत्याविष्कारातून नाशिकमध्ये नटराज गोपीकृष्ण यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 20:43 IST

गुरू विद्याहरी देशपांडे यांच्या शिष्या भक्ती देशपांडे यांनी अंतिम टप्प्यात कथ्थक नृत्याविष्काराला गणेश परणने प्रारंभ केला. त्यानंतर ११ मात्रांचा चारताल की सवारी सादर केली. तसेच चैती यंही भैया मोतिया हैरा गयी... ही ठुमरी आणि तीनतालमध्ये होरीच्या नृत्याविष्काराने कथ्थक कलेच्या नृत्यानुष्ठानचा समारोप करण्यात आला.

ठळक मुद्दे ‘नृत्यानुष्ठान’च्या तिस-या पुष्पाला कलाप्रेमींनी उत्स्फूर्त दाद दिली. कथ्थक नृत्यकलेचा आविष्कार

नाशिक : देशासह परदेशात आपल्या कथ्थक नृत्यकलेचा आविष्कार दाखविणा-या लता बाकलकर यांच्या शिष्या नृत्यांगना तन्वी पालव यांचा रुद्रताल आणि नृत्यांगना भक्ती देशपांडे यांनी सादर केलेल्या ‘चारताल की सवारी’ या कथ्थक नृत्याविष्काराने उपस्थित रसिकांची मने जिंकली.निमित्त होते, नटराज गोपीकृष्ण जयंतीच्या औचित्यावर कीर्ती कलामंदिरच्या वतीने आयोजित ‘नृत्यानुष्ठान’ कार्यक्रमाचे! परशुराम साईखेडकर सभागृहात रविवारी (दि.१९) रंगलेल्या ‘नृत्यानुष्ठान’च्या तिस-या पुष्पाला कलाप्रेमींनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मुकुंद पानसे, जगदीश फडके, रेखा नाडगौडा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी पालव यांनी ११ मात्रांचा रुद्रताल सादर करत रसिकांची दाद मिळविली. परंपरेनुसार त्यांनी थाट, आमद, विलंबित परण, परण, तिहाई, रेला आदी प्रकारांत कथ्थक कलाविष्काराचे सादरीकरण केले. यानंतर पालव यांनी सादर केलेल्या पारंपरिक ठुमरीने कार्यक्रमात आगळा रंग भरला. ‘ऐरी सखी मोरे पिया घर आये...’ या ठुमरीने उपस्थितांची दाद मिळविली.

कार्यक्रमात गुरू विद्याहरी देशपांडे यांच्या शिष्या भक्ती देशपांडे यांनी अंतिम टप्प्यात कथ्थक नृत्याविष्काराला गणेश परणने प्रारंभ केला. त्यानंतर ११ मात्रांचा चारताल की सवारी सादर केली. तसेच चैती यंही भैया मोतिया हैरा गयी... ही ठुमरी आणि तीनतालमध्ये होरीच्या नृत्याविष्काराने कथ्थक कलेच्या नृत्यानुष्ठानचा समारोप करण्यात आला. एकूणच नृत्याविष्कारातून गुरूवर्य नटराज गोपीकृष्ण यांना ‘नृत्यानुष्ठान’च्या माध्यमातून अभिवादन करण्यात आले. यावेळी विवेक मिश्रा (तबला), गायन व संवादिनी रसिका जानोरकर, हिमांशु गिंडे (बासरी) साथसंगत केली.

 

 

टॅग्स :Nashikनाशिकdanceनृत्य