शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’चे धरणे

By admin | Updated: September 13, 2014 00:53 IST

‘स्वाभिमानी’चे धरणे

 

नाशिक : कांद्याचे कोसळलेले भाव व डाळिंबाच्या होणाऱ्या नुकसानीस केंद्र सरकारच जबाबदार असल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून सरकारविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला. दरम्यान, संघटनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाला छावणीचे रूप प्राप्त झाले होते.संघटनेचे प्रांतिक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. त्यात प्रामुख्याने कांदा व डाळींब उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पंतप्रधान मोदी यांनी मागच्याच सरकारचे धोरण राबविण्यास सुरुवात केल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. केंद्र सरकारने परदेशातून कांद्याची आयात केल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, कांदा व बटाट्याला जीवनावश्यक वस्तूंमध्ये समाविष्ट करण्यात आल्याने आता त्यांची आधारभूत किंमतही जाहीर करण्यात यावी. शासनाने परदेशातून तीन हजार रुपये क्विंटलने कांदा आयात केला; मग देशातील शेतकऱ्यांचा कांदा याच दराने का खरेदी केला जात नाही, असा सवाल उपस्थित केला. डाळिंबावर तेल्या रोगाने आक्रमण केल्याने शासनाने त्यासाठी पॅकेज जाहीर करावे, कांदा निर्यातीला केंद्र सरकारने अनुदान द्यावे, कांदा निर्यातमुक्त करावा, कांदा-बटाट्याला जीवनावश्यक वस्तूंमधून वगळण्यात यावे, किमान निर्यातमूल्य शून्य करावे, तीन हजार रुपये आधारमूल्य ठरवावे, डाळिंबाची निर्यात वाढवून अनुदानाचे प्रोत्साहन द्यावे, टोमॅटो निर्यातीला प्रोत्साहन देऊन आयातीला निर्बंध आणावेत अन्यथा सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. या आंदोलनात गोविंद पगार, दीपक पगार, शरद चव्हाण, हंसराज वडघुले, संजय वाघ, बापू जाधव, डोंगर पाटील आदि सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)